परभणी/ प्रतिनिधी
परभणी येथे संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर झालेल्या आंदोलनात सहभागी झाल्याच्या कारणावरून सोमनाथ सुर्यवंशी या तरूणाला बेदम मारहाण करण्यात आली. न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यामुळे राज्यातील कादा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चिंताजनक असून त्यातुनच परभणी, बीड सारख्या घटना घडत असल्याचे माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले.
परभणी येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यासह ज्येष्ठ मंडळींनी मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले. या भेटीपूर्वी सूर्यवंशी कुटुंबीय आणि तीन सदस्यांसोबत सविस्तर चर्चा करून एकूण घटनाक्रम जाणून घेतला. परभणी येथे संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर आयोजित आंदोलनात सहभागी झाल्याच्या कारणावरून सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाला अटक करण्यात आली होती, न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे, सोमनाथच्या मृत्यूला पोलिस यंत्रणा कारणीभूत आहे असा आरोप त्याच्या आईने केला आहे, महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्था चिंताजनक बनली आहे.
त्यातूनच परभणी, बीड सारख्या घटना वारंवार घडत आहेत. पीढित कुटुंबीयांना न्याय मिळेपर्यंत आणि राज्यातील परिस्थितीत सुधारणा होईपर्यंत काँग्रेस यापुढे लढा सुरूच ठेवणार असल्याचे मत माजी मंत्री आ. अमित देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.