खासगी लॅबना चाप लावणारा कायदा लवकरच

मुंबई : प्रतिनिधी
राज्यात आरोग्य चाचण्यांशी निगडित अनेक खासगी लॅब कार्यरत आहेत. मात्र त्यांच्यावर नियंत्रण करणारी कोणतीही संस्था अस्तित्वात नाही. त्यामुळे या खासगी लॅबवर अंकुश आणण्यासाठी विधिमंडळाच्या येत्या अधिवेशनात कायदा आणणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.

तसेच रूग्णांना जी औषधे मिळतात ती बोगस तर नाही ना हे तपासण्यासाठी आता एक खास मशिन खरेदी करण्यात आले आहे. त्यासाठी आता फलाईंग स्कॉड तयार करण्यात येणार असून या मशिनच्या सहायाने बोगस औषधे शोधून काढण्यात येणार आहेत. तसेच नॅशनल इन्स्टीटयूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) च्या धर्तीवर महाराष्ट्र इन्स्टीटयूट ऑफ व्हायरोलॉजी (एमआयव्ही) ची स्थापना करण्यात येणार असून त्यासाठी ३६ कोटींची तरतूदही करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्यभवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना प्रकाश आबिटकर यांनी आरोग्यखात्याकडून जे महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत त्यांची माहिती दिली. राज्यात मोठया प्रमाणात विविध लॅब आहेत. पॅथोलॉजी पासून ते एक्स-रे, एमआरआय, सीटी स्कॅन आदी चाचण्या येथे होतात. पण या लॅबमध्ये मिळणारे रिपोर्ट हे अनेकदा चुकीचे असल्याच्या तक्रारी येत आहेत. अनेक ठिकाणी तर विविध लॅब मध्ये एकाच रूग्णाचे वेगवेगळे रिपोर्ट आल्याचेही प्रकार घडले आहेत.

लॅबच्या दरावर नियंत्रण येणार
लॅबच्या दरावरही कोणतेही नियंत्रण नाही. याची दखल आपण घेतली असून या लॅबवर नियंत्रण आणण्यासाठी येत्या विधिमंडळ अधिवेशनात एक कायदाच पारित करण्यात येणार आहे. त्याचे उल्लंघन केल्यास दंड तसेच कठोर शिक्षेचीही तरतूद असणार असल्याचे आबिटकर यांनी सांगितले.

बोगस औषधे शोधणारी मशिन
राज्य शासनाकडून जी थेट औषध खरेदी होते त्यात काही गैरप्रकार आढळत नाहीत. मात्र जिल्हापरिषदा-महापालिका स्तरावर होणा-या औषध खरेदीत बोगस औषधे आढळल्याचे प्रकार घडले आहेत. रूग्णांना योग्य तीच औषधे मिळाली पाहिजेत असा आपला कटाक्ष आहे. त्यासाठी महाराष्ट्र वैदयकिय वस्तू प्राधीकरणाच्या माध्यमातून ड्रग डिटेक्शन मशिन खरेदी करण्यात आली आहे. फलाईंग स्कॉडच्या माध्यमातून आमचे पथक विविध ठिकाणी भेटी देउन या मशिनच्या माध्यमातून औषधांची क्वालिटी तपासणार आहे. बोगस औषधे आढळल्यास योग्य ती कारवाई करण्यात येईल असे आबिटकर यांनी सांगितले.
प्राथमिक आरोग्य केंद्रातही

सर्पदंशावरील औषधे उपलब्ध
राज्यात आधी सर्पदंशावरील औषधांच्या उपलब्धतेत उणीवा होत्या. मात्र आता त्या पूर्णपणे दूर करण्यात आल्या आहेत. अगदी गावपातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्रातही सर्पदंशावरील औषधे उपलब्ध आहेत. तसेच तेथील डॉक्टर आणि नर्सेसना त्याच्या वापराबददल योग्य ते प्रशिक्षणही देण्यात आल्याचे आबिटकर यांनी सांगितले.

अडीच कोटी महिलांच्या आरोग्य तपासणीचे लक्ष्य
महिलांचे आरोग्य सक्षम राहावे यासाठी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. राज्यात अडीच कोटी महिलांच्या आरोग्य तपासणीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. त्यातील १ कोटी महिलांचे स्क्रिनिंग पूर्ण झाले आहे. त्यातील १३ हजार महिलांना विविध आजार आढळून आले आहेत. त्यावर उपचारही सुरू झाले आहेत. प्रिव्हेंटिव्ह कार्यक्रमाच्या अंतर्गत या तपासण्या करण्यात येत आहेत. जेणेकरून आजार अगदी प्राथमिक अवस्थेतच आढळल्यानंतर त्यावरील उपचार सोपे जातात असेही आबिटकर म्हणाले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Gunratan Sadavarte LIVE : सदावर्ते जरांगेंना रोखणार? ‘चलो मुंबई’च्या घोषणेनंतर काय म्हणाले?
00:00
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20
Video thumbnail
Latur|विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक बाप्पा! लाहोटी शाळेचा अनोखा उपक्रम
02:34
Video thumbnail
Latur|पक्ष बाजूला ठेवा,संकटातून मार्ग काढू!लातूरच्या दुष्काळावर संभाजी पाटील निलंगेकरांचा मोठा प्लॅन
04:53
Video thumbnail
Latur|MPSC विद्यार्थ्यांच्या मोर्चात रोहित पवार! ‘अध्यक्ष-सचिवांनी राजीनामा दिलाच पाहिजे’
01:58
Video thumbnail
MPSC STUDENT PROTEST|MPSC विद्यार्थ्यांचा लातुरात आक्रोश;पेपरफुटी विरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर
03:44
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
10:07
Video thumbnail
Sanjay Raut On Manoj jarange|जरांगेंच्या उपोषणावर राऊत संतापले; सरकारला सुनावलं!
12:37
Video thumbnail
Dharashiv|उमरगा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा! शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
02:40
Video thumbnail
Latur|लातूर ते कोकण थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी! गणेशोत्सवात प्रवाशांची मोठी सोय
03:46

Latest news