महिलांसाठी असलेल्या कायद्याचा गैरवापर होतोय

नवी दिल्ली : अतुल सुभाष आत्महत्या प्रकरणामुळे महिलांसाठी असलेल्या कायद्याचा गैरवापर होत असल्याची चर्चा सध्या देशभरात सुरू आहे. याच चर्चेला धरून सुप्रीम कोर्टात हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचार कायद्यातील सुधारणांशी संबंधित एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र आता सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे. या कायद्यांचा गैरवापर थांबवण्यासाठी आणि त्यात सुधारणा करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

बंगळुरू येथील इंजिनियर अतुल सुभाष यानी केलेल्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर वकील विशाल तिवारी यांनी सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल केली होती. हुंडाबळी आणि कौटुंबिक हिंसाचार यासंबंधीच्या सध्याच्या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमण्याची मागणी करण्यात आली होती. जेणेकरून त्यांचा गैरवापर रोखता येईल. लग्नाच्या वेळी वस्तू, भेटवस्तू, पैशांची यादी तयार करून त्याची नोंद ठेवावी आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्रासोबत जोडावी, अशी मागणीही या याचिकेत केली होती. माफ सुप्रीम कोर्टाने आम्ही काहीही करू शकत नाही म्हणत कायद्यात सुधारणा करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून लावली. सुप्रीम कोर्टातील न्यायमूर्ती बीव्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठाने सोमवारी या जनहित याचिकेवर सुनावणी घेतली. ही बाब समाजातील बदलाशी संबंधित आहे आणि न्यायालय त्यात काहीही करू शकत नाही, असं खंडपीठाने म्हटले. समाज बदलला पाहिजे, आम्ही त्याबाबत काहीही करू शकत नाही. आपल्याकडे संसदेने संमत केलेले कायदे आहेत असे न्यायमूर्ती बीव्ही नागरत्ना म्हणाल्या.

अनेक पीडित पुरुष
हुंडा बंदी कायदा आणि आयपीसीचे कलम ४९८ अ हे विवाहित महिलांना हुंड्याची मागणी आणि छळापासून संरक्षण देण्यासाठी तयार करण्यात आले होते. पण आपल्या देशात हे कायदे अनावश्यक आणि बेकायदेशीर मागण्या निकाली काढण्यासाठी आणि पतीच्या कुटुंबाला दाबण्यासाठीचे हत्यार बनले आहेत. खोट्या तक्रारींमुळे अशा प्रकरणांची गांभीर्याने दखल घेतली जात नाही आणि त्यामुळे ख-या पीडित महिलांना न्याय मिळत नाही. हे फक्त अतुल सुभाष प्रकरणापुरते मर्यादित नाही.

पती आहेत पत्नीच्या दबावाखाली
पत्नीने दाखल केलेल्या खोट्या तक्रारीच्या दबावाखाली येऊन आत्महत्या करणारे अनेक पुरुष आहेत असे याचिकाकर्त्याने म्हटले. दरम्यान, हुंड्यांसदर्भातील कायद्याच्या गैरवापरामुळे तो ज्या उद्देशासाठी बनवला गेलाय त्याचा चुकीचा वापर होतोय, असे याचिकाकर्त्याने म्हटले. मात्र, या प्रकरणात बदल समाजाच्या पातळीवर व्हायला हवा, असे म्हणत सुप्रीम कोर्टाने याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|आदर्श संस्थेमधील घटनेवर भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष आमदार चित्रा वाघ यांनी तीव्र प्रतिक्रिया
01:54
Video thumbnail
Nanded|लग्नाला नकार दिला अन् भररस्त्यात चाकू हल्ला! नांदेडमध्ये खळबळ
00:55
Video thumbnail
Latur|नाईस चायनीज सेंटरमध्ये तोडफोड; आरोपीला सोडल्याचा पोलिसांवर आरोप
03:21
Video thumbnail
Latur|SIR विरोधात महाविकास आघाडी आक्रमक; निलंग्यात ८ ऑक्टोबरला महामोर्चाची घोषणा
05:13
Video thumbnail
Latur|अल्पवयीन मुलींच्या शोषणाच्या आरोपाने लातूर हादरलं; नागरिकांचा मोर्चा
17:27
Video thumbnail
Latur|मध्यरात्री इलेक्ट्रॉनिक दुकान पेटलं; कोट्यवधींचं नुकसान!
03:11
Video thumbnail
Latur|विद्यार्थिनीची लैंगिक छळ प्रकरण!लातूरकर संतापले;आदर्श कॅम्पसवर दगडफेक
03:06
Video thumbnail
mpsc विद्यार्थ्यांच्या आंदोलनातून आमदार रोहित पवार लाईव्ह
24:43
Video thumbnail
Latur|लातूरच्या गांधी मार्केट येथील इलेक्ट्रिक वास्तूच्या दुकानाला भीषण आग#Latur #fire
00:30
Video thumbnail
Latur|लातूर शहरात खुलेआम दादागिरी; चायनीज सेंटरमध्ये दुचाकी घुसवून नासधूस
00:39
Video thumbnail
Latur|लातूरच्या शैक्षणिक क्षेत्रात खळबळ! विद्यार्थिनीचा विनयभंग;संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल
01:15
Video thumbnail
Latur|एकर सोयाबीन पावसाअभावी उद्ध्वस्त; केळगावच्या शेतकऱ्यांचा हृदय पिळवटून टाकणारा निर्णय
03:28
Video thumbnail
Latur|लातूर पोलिसांची दमदार कामगिरी; हरवलेले ५१ मोबाईल मूळ मालकांना परत
03:43
Video thumbnail
Latur|वडवळ नागनाथ गावात भीषण पाणीटंचाई; पाण्यासाठी ग्रामस्थांची वणवण
03:21
Video thumbnail
Nanded|नांदेड पोलिसांची मोठी कामगिरी; चोरीला गेलेले ३०५ मोबाईल मूळ मालकांना परत
02:20

Latest news