28 C
Latur
Friday, October 4, 2024
Homeमहाराष्ट्रलक्ष्मण हाकेंना रुग्णालयातून क्लीन चिट!

लक्ष्मण हाकेंना रुग्णालयातून क्लीन चिट!

मद्यप्राशन केले नसल्याचे चाचणीत उघड

पुणे : प्रतिनिधी
ओबीसी नेते लक्ष्मण हाके मद्यप्राशन करताना आढळले असल्याचा आरोप मराठा कार्यकर्त्यांनी केला असून हाकेंनी मद्यपान केले नसल्याची क्लीन चिट ससून रुग्णालयाने दिली आहे. हाकेंची मद्यपानाची चाचणी करण्यासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात नेले असता सोमवारी रात्री मराठा व ओबीसी समाजाचे कार्यकर्ते रुग्णालयासमोरच आमने-सामने आले होते.

मद्यपानाच्या मुद्यावरून झालेल्या या वादानंतर ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांची ससून रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली. प्राथमिक अहवालात त्यांनी दारू पिलेली नव्हती असा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला असून पुन्हा खात्री करण्यासाठी लक्ष्मण हाके यांच्या रक्ताचे नमुने चाचणीसाठी वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. या चाचणीचा अहवाल येण्यासाठी अजून दोन दिवस तरी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वारंवार एकमेकांच्या समोर येत असल्याचे चित्र असून सोमवारी मध्यरात्री पुण्यातील ससून रुग्णालयासमोर मराठा व ओबीसी कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातल्याचे समोर आले. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी दारूच्या नशेत मराठा कार्यकर्त्यांना शिवीगाळ केल्याचा कार्यकर्त्यांचा आरोप आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR