22.8 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeसोलापूरआवक वाढल्याने पालेभाज्या स्वस्त

आवक वाढल्याने पालेभाज्या स्वस्त

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक वाढल्याने पालेभाज्या स्वस्त आहेत. तर, दुसरीकडे बटाटा, वांगी यांची आवक चांगली आहे. सध्या लग्नसराईमुळे ही बटाटा-वांग्याना अधिक मागणी असल्याचे व्यापा-यांचे म्हणणे आहे.

सध्या पोषक वातावरण असल्याने पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. मेथी, पालक, शेफू कोथिंबिरीच्या पेंढ्याची आठवडाभरात चांगली आवक होत आहे. आठवडाभरापूर्वी कोथिंबीरची एक पेंडी १५ ते २० रुपयांना होती. आता कोथिंबीरचे दर ०५ ते १० रुपयांना मिळत आहे.

मागील आठवडाभरापासून बटाट्याची आवक वाढली आहे. परंतु लग्नसराई इतर समारंभामुळे वांगी-बटाट्यांना मागणी आहे. गेल्या सात दिवसांत २२३३ क्विंटल दरम्यान बटाट्याची आवक झाली असून त्यास सरासरी दर १७०० ते २७०० दरम्यान दर मिळाला आहे. मागील चार दिवसात केवळ १७० क्विंटल वांग्यांची आवक झाली असून दर सरासरी दर ७०० ते ३००० दरम्यान दर मिळाला आहे. लग्नसराई व इतर कार्यक्रमांमुळे सर्वच भाजीपाला आणि लिंबू काकडीला मागणी वाढली आहे.

गेल्या महिनाभरापासून शहरातील बाजारपेठेत फळांची मोठी आवक होत असल्याने दर देखील सामान्यांच्या आवाक्यात आहेत. सध्या बाजारपेठेत संत्री, मोसंबी, सीताफळ, सफरचंद, केळी, चिकू ही फळे खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा मोठा कल आहे. सीताफळाचा दर ३० ते ५० रुपये प्रतिकिलो आहे. दोन ते तीन दिवसांत खाण्यायोग्य होतील, अशा प्रकारची सीताफळे विक्रीस आणली जातात. मात्र, त्यांची विक्री झाली नाही तर २० रुपये किलो मागे तीन ते चार किलो खराब होतात असे फळ विके्रते फरीद शेख यांनी सांगितले. सध्या बटाटा, काकडीला बाजारात मागणी आहे. पुरवठा कमी होत असल्याने मागील महिन्याच्या सुरुवातील भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR