ओतूर : रोहोकडी ता.जुन्नर येथे आठदिवसांपूर्वी अभय घोलप व रखमा घोलप यांच्यावर बिबट हल्ला झालेली घटना ताजी असतानाच गुरुवारी रात्री ८ वाजे सुमारास पुन्हा याच परिसरात बिबट्याने दुचाकीवर झडप घेऊन पाठीमागे बसलेल्या तरुणाला जखमी केले या घटनेमुळे रोहोकडी शिवारात दहशत कायम असून नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी माहिती वनविभागाला समजताच तत्परतेने वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर लहू ठोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल रूपाली जगताप, वैभव वाजे, फुलचंद खंडागळे व टीम येऊन यांनी जखमीला तात्काळ ओतूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नारायणगाव येथे पाठवण्यात आले आहे. यावेळी वनविभगाकडून सांगण्यात आले की तात्काळ आलायडर मशीन बसवली असून रिस्को टीम गस्ती घालणार असून हल्ला झालेल्या परिसरात तीन पिंजरे लावणार असल्याचे सागितले.