शेतातला ऊस शेतातच राहू द्या

कोल्हापूर : ऊस उत्पादक शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले महामार्ग रोको आंदोलन आज सलग दुस-या दिवशीही सुरूच आहे. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळीपासून हावेरीपर्यंत हजारो शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसले असून आंदोलनाची भूमिका स्पष्ट करताना राजू शेट्टी म्हणाले, काल सकाळी ११ वाजल्यापासून महामार्ग रोखून धरलेला आहे. प्रवाशांची गैरसोय होत आहे, त्याबद्दल मी त्यांची माफी मागतो. पण केंद्र सरकारसोबत ४ तास डोकेफोड करूनही काहीही साध्य झाले नाही. २४ तास उलटूनही निर्णय झालेला नाही. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही या न्यायाने दुर्दैवाने आम्हाला हा रस्ता रोखण्याचा निर्णय घ्यावा लागला.

रस्त्यावर अडकलेल्या वाहनचालकांबाबत संवेदनशीलता दाखवत शेट्टी यांनी स्थानिक शेतक-यांना मोठे आवाहन केले. महामार्गावर बाहेरच्या राज्यातून आलेले अनेक ट्रक आणि कंटेनर ड्रायव्हर अडकले आहेत. त्यांची उपासमार होता कामा नये. त्यांच्या चहा-जेवणाची व्यवस्था करा. व्यवस्था होत नसेल तर संघटनेशी संपर्क साधा, आम्ही शिधा पुरवू. पण महाराष्ट्र आणि कर्नाटकचे आतिथ्य आपण दाखवून दिले पाहिजे असे ते म्हणाले.

सरकारची चालढकल
शेट्टींनी केंद्र सरकारच्या धोरणावर जोरदार प्रहार केला. सरकारच्या तिजोरीवर एक रुपयाचाही बोजा पडणार नाही, एवढीच आमची मागणी आहे. ६० रुपयांनी विकल्या जाणा-या साखरेची ५० रुपयांची हमी आम्हाला हवी आहे. तसेच, इथेनॉलमधून मिळणारा पैसा कारखान्यांमार्फत शेतक-यांना द्यावा. गेल्या वर्षभरात ऑईल कंपन्यांनी १ लाख ५० हजार कोटी रुपयांचा नफा कमावला, ज्यातील बहुतांश वाटा इथेनॉलचा आहे. आपल्या जीवावर बाकीचे चैन करत आहेत आणि आपण रस्त्यावर आहोत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. उत्तर प्रदेशचे उदाहरण देत त्यांनी साखरेच्या दरातून कसा काळा पैसा निर्माण होत आहे, हेही स्पष्ट केले.

शेतक-यांनो, एकजूट राहा
शेतक-यांना एकजूट राहण्याचे आवाहन करताना शेट्टी म्हणाले, जोपर्यंत आपल्या शेतात ऊस आहे, तोपर्यंत आपल्याला किंमत आहे. शेतक-यांनी आपला ऊस फक्त ८-१० दिवस शेतातच ठेवावा. नवीन साखर तयार झाली नाही तर बाजारात साखर येणार नाही आणि बरोबर केंद्र सरकारची कोंडी होईल. हे एक ऐतिहासिक आंदोलन असून कोट्यवधींचा घोटाळा करणा-यांना अद्दल घडवण्याची हीच योग्य वेळ आहे. आता हे आंदोलन किती दिवस चालणार आणि केंद्र सरकार शेतक-यांच्या मागण्यांबाबत काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागून आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
अयोध्येत रामललाच्या चरणी यामी गौतम; दर्शन आणि आशीर्वादानंतर केले 'नई नवेली' चित्रपटाचे प्रमोशन.
00:53
Video thumbnail
Hingoli|जिल्हाधिकारी राहुल कर्डिले ॲक्शन मोडमध्ये!तहसील कार्यालयात अचानक धडक
02:31
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो, गुंठेवारीची प्रकरणे दाखल केलीत का? ३१ डिसेंबर अंतिम मुदत!
01:10
Video thumbnail
Latur|लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उत्सुकता वाढली! दोन दिवसांत २२९ अर्जांची विक्री
02:47
Video thumbnail
Latur|ऐन दुष्काळात आगीचं तांडव, 15 एकर ऊस जळून खाक #breakingnews
00:26
Video thumbnail
Latur|बशीर शेखच्या इमारतींचा वाद; कागदपत्रांसाठी महापालिकेकडे वेळेची मागणी!
04:15
Video thumbnail
Latur|लातूरकरांनो सावधान! नळाला तोटी नसेल तर २५ हजारांचा दंड; महापालिकेचा अलर्ट
02:39
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
21:34
Video thumbnail
CM Devendra Fadnavis LIVE :दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय
00:00
Video thumbnail
Latur|आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी RTO चा सुरक्षा कवच!
06:24
Video thumbnail
Purna|बळीराजा साखर कारखान्याच्या १३ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसाला ३,३००.७६ रुपये भाव जाहीर
02:36
Video thumbnail
Latur Drought|लातूरच्या दुष्काळावर तोडगा कधी? निलंगेकरांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक
02:25
Video thumbnail
Bashir Shaikh|लातूरच्या बशीर शेखविरोधात POCSO अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल!
03:21
Video thumbnail
Tuljapur|तुळजाभवानी मंदिरात पोलिसांची दादागिरी? सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण
00:39
Video thumbnail
Latur|पदवीधर निवडणुकीत वचननाम्यावरून वाद! बालाजी पाटील चाकूरकर अडचणीत येणार?
02:16

Latest news