17.3 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयआम्हाला एकदा तरी मुलीला पाहूद्या!

आम्हाला एकदा तरी मुलीला पाहूद्या!

कोलकाता निर्भया प्रकरण आई-वडिलांनी फोडला टाहो

कोलकाता : कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ९ ऑगस्ट रोजी एका महिला ज्युनियर डॉक्टरचा मृतदेह सापडला होता. सुरुवातीला डॉक्टरने आत्महत्या केल्याचे म्हटले जात होते, मात्र नंतर डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संजय रॉयला अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर देशभरातील निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. प्रिन्सिपल आणि सुपरिटेंडेंटला हटवून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.

‘द लॅलनटॉप’ने या घटनेबाबत ट्रेनी डॉक्टरच्या शेजा-यांशी चर्चा केली. त्यांनी जे सांगितले ते मन हेलावून टाकणारे आहे. ट्रेनी डॉक्टरचे आई-वडील आणि आम्ही जेव्हा रुग्णालयात आलो तेव्हा आम्हाला तीन तास तिथे उभे करण्यात आले. आम्हाला एकदा तरी आमची मुलगी दाखवा अशी पालक हात जोडून विनंती करत होते. पण रुग्णालय प्रशासनाने आमचे ऐकले नाही. त्यानंतर वडिलांनी मृत मुलीचा फोटो आणला असता तिच्या तोंडात रक्त आल्याचे दिसले. चष्मा तुटला होता. अंगावर कपडे नव्हते. दोन्ही पायांची अवस्थाही वाईट होती.

साडे दहाच्या सुमारास माझी शेजारी (मृत डॉक्टरची आई) मला मिठी मारून ओरडत, रडत रडत म्हणाली की, सर्व काही संपले आहे. मी विचारले काय झाले? त्यांनी सांगितले की, माझ्या मुलीने आत्महत्या केल्याची माहिती हॉस्पिटलमधून मिळाली आहे. कधी आणि कसे झाले असे विचारल्यावर ते म्हणाले की, आम्हाला फक्त एवढच सांगितले आहे. यानंतर मुलीचे आई-वडील, मी आणि आमचे आणखी एक शेजारी रुग्णालयात पोहोचलो. तिथे आम्हाला तीस तास उभे ठेवले होते.

ज्या आई-वडिलांची ३१ वर्षांची मुलगी अशाप्रकारे गेली त्यांना तीन तास उभे केले. आम्हाला एकदा आमच्या मुलीला पाहुद्या असे म्हणत आई-वडील हात जोडत होते. पण आम्हाला तिचा चेहरा दाखवला नाही. त्यानंतर पालकांना ते सेमिनार हॉलमध्ये घेऊन गेले. वडिलांनी आपल्या मोबाईलमध्ये तिचा फोटो काढला आणि मला दाखवला. तिच्या तोंडातून रक्त येत होते. शरीरावर कपडे नव्हते आणि खूप वाईट अवस्था होती. गळा दाबून तिला मारले होते.

घडलेली घटना अत्यंत वाईट
शेजा-यांनी असेही सांगितले की, मी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना विनंती करते, जर माझे शब्द त्यांच्यापर्यंत पोहोचत असतील तर या प्रकरणात पीडितेच्या कुटुंबाला योग्य न्याय मिळाला पाहिजे. मी जे काही बोलले ते खरे आहे. या सर्व गोष्टी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सांगितल्या आहेत. ती एक हुशार मुलगी होती आणि एक चांगली डॉक्टर होणार होती. तिच्यासोबत घडलेली ही घटना अत्यंत वाईट आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR