32.5 C
Latur
Sunday, May 26, 2024
Homeधाराशिवचला आता एकत्र नांदू या, नागरिकांच्या समस्या सोडवूया.....

चला आता एकत्र नांदू या, नागरिकांच्या समस्या सोडवूया…..

कळंब : सतीश टोणगे
लोकशाहीच्या उत्सवात सर्वांनीच उत्साहाने सहभाग नोंदवला असून निवडणुकीच्या रणधुमाळीत आपापल्या नेत्यावरचे प्रेम, निष्ठा दाखवण्यासाठी सर्वांनी खूप धडपड केली. मतदान ही संपले. सर्वच उमेदवारांचे कार्यकर्ते गुलाल तर आम्हीच उधळणार… असे आनंदाने सांगत आहेत. या निवडणुकीत करोडो रुपयांची उधळण झाली, कार्यकर्त्यांचे मात्र गाडी आणि जेवण या वरच समाधान केले.

उन्हाच्या तीव्रतेबरोबर गावातील एकमेकांबद्दल समज गैरसमज वाढली. भावाभावांत दुरी निर्माण झाली ही निवडणूक लोकसभेची असतानाही ग्रामपंचायत निवडणूक असल्यासारखे वातावरण होते, कोण कुणाच्या घरी जाते कोण कोणाला बोलते यावर बारीक लक्ष होते गाव पुढा-यापासून राष्ट्रीय नेत्याच्या भाषणांनी वातावरण ढवळून निघाले असले तरी उन्हाच्या तीव्रतेमुळे मतदारांना घराच्या बाहेर मतदानासाठी काढताना कार्यकर्ते मात्र घामा घुम झाले. एक एक तासाला किती मतदान झाले हे नेत्याला बाजूला होऊन कार्यकर्ते सांगत होते, यात ही चढाओढ लागली होती. चार दिवसाची निवडणूक संपली आहे, निकाल काहीही लागो… आता सगळे विसरून पुन्हा गावात एकत्र नांदण्याची गरज आहे. आता यापुढे कुणाचेही उणे दुणे काढण्याची गरज नाही. गावच्या विकासासाठी व मूलभूत प्रश्न सोडवण्या साठी एकत्र येऊन येणा-या खासदार यांच्या कडून काम करून घेण्याची गरज आहे. गावातील गटबाजी मुळे तर विकास कोसो दूर आहे.

गटबाजी हिच मोठी विकासाला लागलेली कीड आहे, ही आपणच संपवली पाहिजे…..जाती धर्माच्या नावावर नेतेमंडळी दुफळी निर्माण करून, स्वत: पोळी भाजून घेतात,…..आणि गावचे नुकसान करतात,आता तरी शहाणे या अशी कुजबूज आता होऊ लागली आहे…….एकंदर रोज आता मतांची आकडे मोड होईल, गावात कोणाला कितीची लीड भेटेल, कोण विरोधात गेले या वर चर्चा होईल….पण या चर्चे चे रूपांतर मात्र भांडणात होऊ नये म्हणजे झालं…..प्रत्येक गावात शेकडो बेकार युवक आहेत त्यांना नौकरी, व्यवसाय यासाठी गावांनी पुढाकार घेवून ते प्रश्न मिटविले पाहिजेत. नाहीतर पुन्हा विधान सभेला कोणाचा तरी झेंडा घेऊन निघाला सभेला असे होऊ नये….

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR