36.9 C
Latur
Sunday, May 19, 2024
Homeराष्ट्रीयकाँग्रेसच्या माजी प्रवक्त्या राधिका खेरा भाजपमध्ये सामिल

काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या राधिका खेरा भाजपमध्ये सामिल

नवी दिल्ली : काँग्रेसच्या माजी प्रवक्त्या राधिका खेरा यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. खेरा यांनी दोन दिवसांपूर्वी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता. राधिका खेरा यांनी छत्तीसगडमध्ये आपल्यासोबत गैरवर्तन आणि अयोध्यामधील राम मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेतल्यामुळे आपल्या विरोधात कट रचल्याचा आरोप करत काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला होता मात्र, राधिका खेरा यांनी केलेले आरोप भाजपमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी केले असल्याचा दावा राजकीय जाणकारांनी केला आहे.

दरम्यान, भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसच्या माजी नेत्या राधिका खेरा म्हणाल्या की, रामभक्त असल्याने माझ्यावर रामलल्लाचे दर्शन घेऊन कौशल्या मातेच्या भूमीवर गैरवर्तन करण्यात आले. मला भाजप सरकार, मोदी सरकारचे संरक्षण मिळाले नाही, असे खेरा म्हणाल्या. आजची काँग्रेस महात्मा गांधींची काँग्रेस नाही, ती रामविरोधी, हिंदूविरोधी काँग्रेस आहे, असा आरोपही खेरा यांनी केला, दरम्यान, खेरा

राधिका खेरा काय म्हणाल्या ?
तत्पूर्वी, काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर राधिका खेडरा यांनी सांगितले होते की, छत्तीसगड काँग्रेसच्या कम्युनिकेशन विभागाचे अध्यक्ष सुशील आनंद शुक्ला यांनी त्यांच्या दोन सहका-यांनी रायपूर येथील पक्ष कार्यालयात त्यांच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला. याबाबत त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना माहिती दिली असता, आरोपी नेत्यांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, यामुळे आपण राजीनामा देत आहोत, असे खेरा म्हणाल्या होता.

सुशील आनंद यांनी केला पलटवार
दरम्यान, राधिका खेरा यांच्या आरोपाचे खंडण करत छत्तीसगड काँग्रेसचे कम्युनिकेशन विभागाचे अध्यक्ष सुशील आनंद शुक्ला यांच्यावर पलटवार केला आहे. शुक्ला म्हणाले की, मी एका शिक्षित कुटुंबातून येतो. मला माझी सामाजिक आणि कौटुंबिक प्रतिष्ठेची जाणीव आहे. राधिका खेरा यांनी केलेल्या आरोपामुळे खूप दु:खी झालो असून, माझी राजकीय हत्या करण्यासाठी आणि मला अपमानित करण्यासाठी हे षडयंत्र रचले आहे, असे शुक्ला म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR