22.3 C
Latur
Sunday, October 6, 2024
Homeमहाराष्ट्रविदर्भात पावसाची हुलकावणी, इतरत्र अतिवृष्टीची शक्यता

विदर्भात पावसाची हुलकावणी, इतरत्र अतिवृष्टीची शक्यता

हवामान विभागाची माहिती सतर्कतेच्या सूचना जारी

पुणे : राज्याच्या विविध भागात चांगला पाऊस पडत असला तरी देखील विदर्भात मात्र पावसाचा जोर कमी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार जून महिन्यात पावसाने विदर्भाला चांगलीच हुलकावणी दिली आहे. जून महिन्यात संपूर्ण विदर्भामध्ये सरासरीपेक्षा १६ टक्के कमी पाऊस झाला. तर पूर्व विदर्भात पावसाची तूट अजून मोठी असून भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथे तर जून महिन्याच्या सरासरीपेक्षा पावसाची तूट ४० टक्के आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यात अजूनही मोठ्या पावसाच्या अपेक्षा आहेत. वरुणराजाने जून महिन्यात केलेल्या निराशेमुळे बळीराजाही चिंतेत आहे. यामुळे शेतीचे गणित बिघडल्याचे पाहायला मिळत आहे. दुस-या बाजूला उष्ण आणि दमट हवामानामुळे रोगराईचे प्रमाण देखील वाढले आहे.

सरासरी पावसाची तूट किती?
– भंडारा – ५८ टक्के
– गोंदिया – ४७ टक्के
– गडचिरोली – ४१ टक्के
– चंद्रपूर – २२ टक्के
– नागपूर – २२ टक्के
– वर्धा – ११ टक्के

मराठवाडा यलो अलर्ट
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज राज्याच्या विविध भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज कोकणसह संपूर्ण मराठवाडा पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे जोरदार पावसाची शक्यता आहे. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट जारी करण्यात येत आहे, मात्र, प्रत्यक्षात पाऊस पडत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

काही ठिकाणी ६ जुलैपर्यंत रेड अलर्ट जारी
महाराष्ट्रात ६ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि किनारपट्टीवरील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी आहे. त्याचबरोबर काही भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय ५ आणि ६ जुलै रोजी काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR