17.7 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeमहाराष्ट्रगड-किल्ल्यावर पुन्हा सापडल्या दारूच्या बाटल्या

गड-किल्ल्यावर पुन्हा सापडल्या दारूच्या बाटल्या

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे गड-किल्ले म्हणजे सर्वांचे स्फूर्तिस्थान आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यासाठी सरकारने युनेस्को हेरीटेज लिस्ट २०२४-२५साठी प्रस्ताव पाठवला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने १२ किल्ल्यांचा हा प्रस्ताव पाठवला आहे. एकीकडे सरकारचे गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न होत असताना मद्यपींनी गड-किल्ल्यांचे पावित्र्य धोक्यात आणले आहे. पुणे येथील सिंहगडावर दारूच्या बाटल्या आढळल्या आहेत.

पुणे शहरापासून सर्वांत जवळ असलेल्या सिंहगडावर मद्यपींचा गोंधळ सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. किल्ले सिंहगडावर दारूच्या बाटल्या आढळल्या आहेत. किल्ल्यावर जवळपास १२ वेगवेगळ्या ब्रँडच्या दारूच्या बाटल्या सापडल्या आहेत. यामुळे शिवप्रेमी संतप्त झाले आहेत. गड-किल्ल्यांचे पावित्र्य धोक्­यात आल्यामुळे नाराजी व्यक्त होते आहे.

शिवजयंती नऊ दिवसांवर
शिवाजी महाराजांची जयंती येत्या १९ फेब्रुवारी रोजी आहे. शिवजयंतीनिमित्त अनेक शिवप्रेमी सिंहगडावर येऊन महाराजांना मानाचा मुजरा करतात. नऊ दिवसांवर शिवजयंती आली असताना किल्ल्यावर तळिरामांनी पार्टी केल्याचे दिसून येत आहे. परंतु त्या किल्ल्यावर दारूच्या बाटल्या कशा गेल्या? सिंहगडावर असलेले सुरक्षा रक्षक काय करतात? मद्यपी आणि गोंधळ घालणा-यांवर कठोर कारवाई का केली जात नाही? असा प्रश्न शिवप्रेमींना पडला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR