21.2 C
Latur
Thursday, October 24, 2024
Homeमहाराष्ट्रकाँग्रेसची ४८ उमेदवारांची यादी जाहीर

काँग्रेसची ४८ उमेदवारांची यादी जाहीर

मुंबई : महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाची ४८ उमेदवारांची पहिली यादी गुरूवार दि. २४ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ साठी आता सर्वपक्षीय उमेदवार याद्या जाहीर होत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारी यादीची उत्सुकता लागली होती.

आता काँग्रेसने त्यामध्ये बाजी मारली आहे. काँग्रेसने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. पहिल्या उमेदवारी यादीमध्ये ४८ उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यासारख्या ज्येष्ठ आमदारांचा समावेश आहे.

अक्कलकुवा : केसी पाडवी
शाहदा : राजेंद्रकुमार गावीत
नंदूरबार : कीरण तडवी
नवापूर : शिरीषकुमार नाईक
साक्री : प्रविण चौरे
रावेर : धनंजय चौधरी
मलकापूर : राजेश एकाडे
चिखली : राहुल बोंद्रे
रिसोड : अमित झनक
धामणगाव रेल्वे : विरेन्द्र जगताप
अमरावती : सुनिल देशमुख
तिवसा : यशोमती ठाकूर
अचलपूर : अनिरुध्द देशमुख
देवळी : रणजीत कांबळे
नागपूर द. प -प्रफुल्ल गुडदे
नागपूर मध्य – बंदी शेळके
नागपूर पश्चिम : विकास ठाकरे
नागपूर उत्तर : नितिन राऊत
चाकोली : नाना पटोले
गोदींया : गोपालदास अग्रवाल
राजुरा : सुभाष धोटे
ब्रम्हपुरी : विजय वडेट्टीवार
चिमूर : सतिश वर्जुकर
हदगाव : माधवराव पाटील
भोकर : तिरुपती कोडेंकर
नायगाव : मिनल पाटील खतगावकर
पाथरी : सुरेश वरपुडकर
फुलंब्री : विलास अवताडे
मिरा भाईंदर : सय्यद मुजफ्फर हुसैन
मालाड पश्चिम : असलम शेख
मुंबादेवी : अमिन पटेल
पुरंदर : संजय जगताप
भोर : संग्राम थोपटे
कसबा पेठ : रविंद्र धंगेकर
संगमनेर : विजय थोरात
शिर्डी : प्रभावती घोगरे
लातूर शहर : अमित विलासराव देशमुख
लातूर ग्रामीण : धीरज विलासराव देशमुख
अक्कलकोट : सिध्दराम म्हेत्रे
कराड दक्षिण : पृथ्वीराज चव्हाण
करवीर : राहुल पाटील
हातकणंगले : राजु आवाळे
पलुस -कडेगाव : विश्वजीत कदम
धुळे ग्रामीण : कुणाल रोहिदास पाटील
धारावी : डॉ. ज्योती गायकवाड
चांदिवली : मो. आरीफ नसीम खान
कोल्हापूर दक्षिण : ऋतुराज पाटील
जत : विक्रमसिंह सावंत

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR