22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeसोलापूरपशुपालकांनी पशुगणनेत सहभागी व्हावे

पशुपालकांनी पशुगणनेत सहभागी व्हावे

सोलापूर – केंद्र शासनाच्या आदेशानुसार जिल्हयामध्ये २५ नोव्हेंबरपासून पशुगणना मोहिमेची सुरवात झाली आहे. ही पशुगणना २८ फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार असून या कालावधीत प्रगणक घरोघरी जाऊन, पशुधनाची माहिती घेणार आहेत. प्रत्येक गावातील व शहरातील प्रगणक नागरिकांशी संवाद साधून माहिती गोळा करणार आहेत. तरी नागरिकांनी या गणनेत योग्य माहिती देवून सहकार्य करावे असे, आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एन.एल. नरळे यांनी केले आहे.

या पशुगणनेमध्ये सर्व प्रजातीच्या पशुधन व कुक्कुट पक्षी जाती लिंग व वय निहाय गणना करण्यात येणार आहे. पशुगणना ही संगणकीय प्रणालीवर होणार असल्याने सदरची पशुगणना करणेसाठी प्रगणकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.

पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यात २९२ प्रगणक व ८० पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे. शहरी भागाकरीता ४ हजार घरामागे १ प्रगणक व ग्रामीण भागाकरीता ३ हजार घरामागे १ प्रगणक नियुक्ती केली आहे. पशुगणनेत प्रगणक कुटुंब प्रमुखाचे नाव, त्यांचे शिक्षण, जनावर त्याची प्रजात, वय, लिंग, त्यांचा कोणत्या उद्देशाकरीता पालन केले जाते, त्यापासून मिळणारे उत्पादन आदी विविध माहिती संकलित केली जाणार आहे. कत्तलखाना, दररोज होणाऱ्या जनावर व पक्षीनिहाय कत्तलीची संख्या, गोशाळा, छोटे मोठे नोंदणीकृत व अनोंदणीकृत कुक्कुटपालन संस्था, मांस विक्री केंद्र तेथे रोजची जनावरे, पक्षीनिहाय कत्तल विक्री, मोकाट जनावरे, कुत्रे आदी विविध प्रकारची नोंदणी वेगवेगळ्या पध्दतीने केली जाईल. या पशुगणनेमधून प्राप्त होणारी माहिती पुढील

पाच वर्षाचे नियोजन, धोरणात्मक निर्णय व विविध योजनांकरीता उपयुक्त असल्याने सदर पशुगणना महत्वाची आहे. पशुगणना करणाऱ्या प्रगणकांना सर्वतोपरी सहकार्य करावे आवाहनही मुख्य कार्यकारी अधिकारी कूलदिप जंगम, अति मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिणकर यांनी केले आहे.कोणतेही पशुधन वंचीत राहणार नाही.

सर्व ग्रामपंचायत स्तरावरील सर्व सरपंच, ग्राम पंचायत अधिकारी, सर्व कर्मचारी यांनी गावपातळीवर पशुगणना (दि. २५) नोव्हेंबर २०२४ ते (दि.२८) फेब्रुवारी २०२५ पर्यंत होणार असल्यामुळे पशुगणना करणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करावे. जेणे करून गावपातळीवरील सर्व पशुधनाची नोंद पशुगणनेमध्ये होईल. पशुगणनेपासुन कोणतेही पशुधन वंचीत राहणार नाही.असे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एन.एल. नरळे यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR