21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमुख्य बातम्याकर्ज महाग होणार नाही, ईएमआय वाढणार नाही

कर्ज महाग होणार नाही, ईएमआय वाढणार नाही

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सलग सहाव्यांदा व्याजदरात बदल केलेला नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने व्याजदर ६.५% वर कायम ठेवले आहेत. म्हणजे कर्ज महाग होणार नाही आणि तुमचा इएमआयसुद्धा वाढणार नाही. फेब्रुवारी २०२३ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शेवटचे दर ०.२५% ते ६.५% ने वाढवले ​​होते.

तर गेल्या आर्थिक वर्षात रेपो दरात ६ वेळा २.५०% ने वाढ करण्यात आली होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज (गुरुवार) ८ फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. दर दोन महिन्यांनी ही बैठक होते. आरबीआयने डिसेंबरच्या आधीच्या बैठकीत व्याजदर वाढवले ​​नव्हते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR