22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeसोलापूरभाजपकडून सोलापूर लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी ईच्छुकांची लॉबिंग

भाजपकडून सोलापूर लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी ईच्छुकांची लॉबिंग

सोलापूर : लोकसभा निवडणुकांचा बिगुल काही दिवसांत वाजणार आहे. भारतीय जनता पार्टीने यंदाचा सोलापूर लोकसभेचा उमेदवार घोषित केलेला नाही. विद्यमान खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महाराज स्वामी हे जातीच्या दाखल्यामुळे पाच वर्षे अडचणीतच होते. २०२४ ला होणाऱ्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांना भाजप उमेदवारी देणार की नाही याबाबत अजूनही साशंकता आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप पक्ष अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र असणाऱ्या मजबूत उमेदवाराच्या शोधात आहे. सोलापुरातील दिलीप शिंदे हे अनुसूचित जातीचे असून अनेक दिवसांपासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी दिलीप शिंदे यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेऊन भाजपकडून सोलापूर लोकसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी जोरदार लॉबिंग केली आहे. दिलीप शिंदे लोकसभेची तयारी करत असताना आणि देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने इच्छुक असलेले इतर उमेदवार अमर साबळे, माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते, माजी खासदार शरद बनसोडे यांची धाकधूक वाढली आहे.

दिलीप शिंदेंनी आरएसएससोबत संपर्क वाढवला
सोलापूर लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी मिळावी यासाठी दिलीप शिंदे यांनी आरएसएसशी संपर्क वाढवला आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख पदाधिकाऱ्यांशी दिलीप शिंदेंनी सहवास वाढवल्याने भाजपच्या इच्छुक उमेदवारांत अस्वस्थता पसरली आहे. दिलीप शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या भेटी घेत उमेदवारीची मागणी केली आहे. दिलीप शिंदे यांनी सोलापूर शहर जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक मान्यवरांचीही भेट घेतली आहे.

सोलापुरात भाजपला लोकसभेसाठी उमेदवार शोधणं जिकिरीचं झालं आहे. भाजपची ही अवस्था पाहून विरोधी स्थानिक नेते भाजपवर नेहमी टीका करतायत. सोलापूरच्या माजी नगरसेविका संगीता जाधव, माजी नगरसेवक दत्तात्रय बनसोडे देखील भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. यामध्ये दिलीप शिंदे हे मूळ सोलापूरचे असून अनुसूचित जातीचे आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR