नवी दिल्ली : लोकसभेचे कामकाज गुरुवारी (२१ डिसेंबर) अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले. विशेष म्हणजे, संसदेचे हिवाळी अधिवेशन शुक्रवारी (२२ डिसेंबर) संपत होते. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात म्हणजेच १३ डिसेंबर रोजी संसदेच्या सुरक्षेबाबत मोठी चूक समोर आली होती. या संदर्भात विरोधी पक्षांनी सभागृहात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी केली आणि त्यामुळे सभागृहात गदारोळ झाला.