23 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रलोकसभा निवडणूक २०२४ ; आता पर्यंतचा कल- महायुती : २०, महाविकास आघाडी :...

लोकसभा निवडणूक २०२४ ; आता पर्यंतचा कल- महायुती : २०, महाविकास आघाडी : २७

मुंबई : लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया सात टप्प्यात पूर्ण झाली. आता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. ताज्या ट्रेंडनुसार, इंडि आघाडीच्या तुलनेत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा वेग जवळपास दुप्पट असल्याचे दिसते. कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी सुरू आहे. देशभरातील सर्व मतमोजणी केंद्रांवर त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मतमोजणी केंद्राच्या बाहेर स्थानिक पोलीस तैनात आहेत. मतमोजणी स्थळी एसआरपीएफ आणि मतमोजणी केंद्राबाहेर सीएपीएफ तसेच स्ट्राँग रूमच्या दरवाजांवर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ड्युटीवर असलेले अधिकारी आणि अधिकृत राजकीय प्रतिनिधींशिवाय कोणत्याही व्यक्तीला मतमोजणीच्या आवारात प्रवेश दिला जात नाही. निवडणूक नियमावलीनुसार आधी पोस्टल मतपत्रिकेची मोजणी करण्यात आली आणि त्याच्या अर्ध्या तासानंतर मशिनमध्ये (ईव्हीएम) नोंद झालेल्या मतांची मोजणी सुरू करण्यात आली.

दरम्यान, महाराष्ट्रातील लोकसभा निवडणूक २०२४ चा आता पर्यंतचा कल
महायुती : २०, महाविकास आघाडी : २७

दक्षिण-मध्य मुंबई : अनिल देसाई आघाडीवर (ठाकरे गट)
इशान्य मुंबई : संजय दिना पाटील आघाडीवर (ठाकरे गट)
दक्षिण मुंबई : अरविंद सावंत आघाडीवर (ठाकरे गट)
उत्तर मुंबई : पियूष गोयल आघाडीवर (भाजप)
उत्तर-पश्चिम मुंबई : रवींद्र वायकर आघाडीवर (शिंदे गट)
कल्याण : श्रीकांत शिंदे आघाडीवर (शिंदे गट)
ठाणे : नरेश म्हस्के आघाडीवर (शिंदे गट)
पालघर : हेमंत सावरा आघाडीवर (भाजप)
रायगड : सुनील तटकरे आघाडीवर (अजित पवार गट)
नगर : सुजय विखे आघाडीवर (भाजप)
बीड : पंकजा मुंडे पिछाडीवर (भाजप)
हिंगोली :राजेश पाटील आष्टीकर आघाडीवर ( ठाकरे गट)
छ. संभाजीनगर : संदीपान भुमरे (शिंदे गट)
धाराशिव : ओमराजे निंबाळकर आघाडीवर (ठाकरे गट)
लातूर :  शिवाजीराव काळगे (काँग्रेस) आघाडीवर
नांदेड : वसंत चव्हाण आघाडीवर (कॉंग्रेस)
जालना : कल्याण काळे आघाडीवर (कॉंग्रेस)
सातारा : शशिकांत शिंदे आघाडीवर (शरद पवार गट)
सोलापूर : प्रणिती शिंदे आघाडीवर (कॉंग्रेस)
पुणे : मुरलीधर मोहोळ आघाडीवर (भाजप)
मावळ : श्रीरंग बारणे आघाडीवर (शिंदे गट)
रत्नागिरी-सिंधुदुर्ग : नारायण राणे आघाडीवर (भाजप)
बारामती : सुप्रिया सुळे आघाडीवर (शरद पवार गट)
माढा : धैर्यशील मोहिते पाटील आघाडीवर (शरद पवार गट)
नागपूर : नितीन गडकरी आघाडीवर (भाजप)
रामटेक : श्यामकुमार बर्वे आघाडीवर (कॉंग्रेस)
चंद्रपूर : प्रतिभा धानोरकर आघाडीवर (कॉंग्रेस)
भिवंडी : सुरेश म्हात्रे आघाडीवर (शरद पवार गट)
सांगली : विशाल पाटील आघाडीवर (अपक्ष)
शिर्डी : भाऊसाहेब वाघचौरे आघाडीवर (ठाकरे गट)
नंदूरबार : गोवाल पाडवी आघाडीवर (कॉंग्रेस)
रावेर : रक्षा खडसे आघाडीवर (भाजप)
जळगाव : स्मिता वाघ आघाडीवर (भाजप)
नाशिक : राजाभाऊ वाजे आघाडीवर (ठाकरे गट)
दिंडोरी : भास्कर भगरे आघाडीवर (शरद पवार गट)
शिरुर : अमोल कोल्हे आघाडीवर (शरद पवार गट)
धुळे : शोभा बच्छाव आघाडीवर (कॉंग्रेस)
कोल्हापूर : शाहू महाराज आघाडीवर (कॉंग्रेस)
अमरावती : नवनीत राणा आघाडीवर (भाजप)
अकोला : अभय पाटील आघाडीवर (कॉंग्रेस)
वर्धा : अमर काळे आघाडीवर (शरद पवार गट)
गोंदिया-भंडारा : सुनिल मेढे आघाडीवर (भाजप)
गडचिरोली-चिमूर : नामदेव किरसान आघाडीवर (कॉंग्रेस)

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR