31.2 C
Latur
Thursday, May 9, 2024
Homeछत्रपती संभाजीनगरफडणवीसांचे भाषण सुरु असतानाच संभाजीनगरात लाभार्थ्यांचा राडा

फडणवीसांचे भाषण सुरु असतानाच संभाजीनगरात लाभार्थ्यांचा राडा

छत्रपती संभाजीनगर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रपती संभाजी नगर इथल्या कार्यक्रमात मेडिकल कीट मिळवण्यासाठी लाभार्थ्यांनी चांगलीच धक्काबुक्की आणि पळवापळवी केल्याचे पहायला मिळाले.

आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या मतदारसंघात विविध साहित्य वाटपाचा आणि विकासकामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आयोजित केला होता. यावेळी फडणवीसांचे भाषणही होणार होते, त्यानंतर लाभार्थ्यांपैकी कामगार, खेळाडू आणि सर्वसामान्यांसाठी विविध प्रकारच्या कीटचे वाटप करण्यात येणार होते.

मात्र फडणवीसांचे भाषण सुरु असतानाच हे कीट पळवापळवी सुरु झाली. काही लोकांनी तर कीट ज्या ठिकाणी ठेवले होते त्या ठिकाणचे मांडवाचे पत्रे काढून वाट निर्माण केली आणि खोके, पेट्या पळवल्या. यानंतर फडणवीसांना आपले भाषण आवरते घ्यावे लागले. यावेळी काही लोकांनी एकमेकांना हाणामारी देखील केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR