मोठ्या आवाजामुळे तरुणांच्या श्रवणशक्तीवर गंभीर परिणाम

मुंबई : हेडफोन आणि इअरफोनचा वाढता वापर तरुणांच्या श्रवणशक्तीवर दुष्परिणाम करत आहे. वारंवार इअरफोनचा वापर, जास्त वेळ डिजिटल उपकरणांवर घालवणे आणि शहरांमध्ये वाढलेली आवाजाची पातळी यामुळे २० ते ३० वयोगटातील तरुणांमध्ये श्रवणविषयक समस्या वाढत आहेत. योग्य वेळी प्रतिबंधात्मक उपाय न केल्यास ही समस्या पुढे जाऊन कायमस्वरूपी श्रवणशक्ती कमी होण्याचे मुख्य कारण ठरू शकते.

आजच्या डिजिटल युगात अनेक तरुण दररोज कामाच्या ठिकाणी, संगीत फावल्या वेळेत तसेच प्रवासात संगीत ऐकण्यासाठी, गेमिंग किंवा ऑनलाइन कंटेंट पाहण्यासाठी तासनतास इअरफोनचा वापर करतात. मात्र सतत मोठ्या आवाजाच्या संपर्कात राहिल्याने कानांना विश्रांती मिळत नाही. यामुळे कानाच्या आतील संवेदनशील संरचनेवर परिणाम होऊन श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका वाढतो.

मुंबईतील अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटल येथील कान, नाक, घसा विकार तज्ज्ञ डॉ. अंकित जैन म्हणाले, इअरफोन्स हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग ठरला आहे, परंतु त्याच्या जास्त आवाजामुळे कालांतराने श्रवणशक्तीला हानी पोहोचू शकते. आपल्या कानाच्या आतील भागात नाजूक संवेदी पेशी असतात ज्या मेंदूसाठी ध्वनीच्या माध्यमातून सिग्नल पोहोतवणाचे काम करतात.

मोठ्या आवाजाच्या सततच्या संपर्कामुळे या पेशींचे कायमचे नुकसान होऊ शकते आणि एकदा त्या प्रभावित झाल्या की त्या पुन्हा निर्माण होऊ शकत नाहीत. दरमहा, २०-३० वयोगटातील जवळजवळ ६०% व्यक्तींना हेडफोन्सचा दीर्घकाळ वापर आणि मोठ्या आवाजाच्या वारंवार संपर्कामुळे श्रवण क्षमता कमी झाल्याची लक्षणे दिसून येतात. डॉ. जैन पुढे सांगतात की, १० पैकी ६ तरुण कानात सतत आवाज येणे (टिनिटस), संभाषण स्पष्ट ऐकू न येणे किंवा मोबाईल-लॅपटॉपवरील आवाज वारंवार वाढवण्याची गरज भासणे अशा तक्रारी नोंदवतात. अशा सवयी दीर्घकाळ आढळल्यास भविष्यात कायमस्वरूपी श्रवणशक्ती कमी होण्याचा धोका वाढू शकतो.

इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटचा अधिक वापर
शहरी वातावरणातील वाढत्या आवाजाच्या पातळीमुळेही ही समस्या तीव्रतेने वाढत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. वाढता ट्राफिक, सुरु असलेली बांधकामे आणि सार्वजनिक ठिकाणांवरील गोंगाट यामुळे बरेचजण कामातील हेडफोन्सचा आवाज वाढवतात, ज्याचा थेट परिणाम त्यांच्या कानांवर होतो.

४० टक्के तरुणांमध्ये समस्या
डोंबिवलीतील एम्स हॉस्पिटलच्या ईएनटी सर्जन डॉ. नेहा पंगम म्हणाल्या, सध्या दरमहा २० ते ३० वयोगटातील सुमारे ४० टक्के तरुणांमध्ये श्रवणविषयक समस्यांची सुरुवातीची लक्षणे दिसू आली आहेत. कानात आवाज येणे, गर्दीत स्पष्ट ऐकू न येणे, वारंवार लोकांना पुन्हा बोलण्यास सांगावे लागणे, कानात दाब जाणवणे किंवा फोनवरील आवाज सतत वाढवावा लागणे अशा तक्रारी वाढत आहेत. हे तरुणांमधील श्रवण क्षमतेसंबंधीत समस्या वाढल्याचे स्पष्ट करते.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Latur|लातूरच्या उदगीरमध्ये शेतकऱ्यांचा रास्तारोको! हेक्टरी 1 लाख नुकसानभरपाईची मागणी
02:50
Video thumbnail
Latur Ground Report|लातूरचा रिंग रोड खड्ड्यात! वाहनधारकांची जीवघेणी कसरत
03:25
Video thumbnail
विठ्ठल कांगणे सर फडणवीसांच्या भेटीला गेले अन् विद्यार्थी नाराज! रमेश पाटील यांचा थेट फोन
02:23
Video thumbnail
Latur|पावसासाठी हजारो मुस्लिम बांधवांचं अल्लाहकडे साकडं! लातूरच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज
05:52
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
01:12:21
Video thumbnail
Gunratan Sadavarte LIVE : सदावर्ते जरांगेंना रोखणार? ‘चलो मुंबई’च्या घोषणेनंतर काय म्हणाले?
00:00
Video thumbnail
Nanded|DJ बंदीवर गौतमी पाटीलची ‘नो कमेंट’! टीकाकारांवरही मौन
02:20
Video thumbnail
Latur|विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक बाप्पा! लाहोटी शाळेचा अनोखा उपक्रम
02:34
Video thumbnail
Latur|पक्ष बाजूला ठेवा,संकटातून मार्ग काढू!लातूरच्या दुष्काळावर संभाजी पाटील निलंगेकरांचा मोठा प्लॅन
04:53
Video thumbnail
Latur|MPSC विद्यार्थ्यांच्या मोर्चात रोहित पवार! ‘अध्यक्ष-सचिवांनी राजीनामा दिलाच पाहिजे’
01:58
Video thumbnail
MPSC STUDENT PROTEST|MPSC विद्यार्थ्यांचा लातुरात आक्रोश;पेपरफुटी विरोधात हजारो विद्यार्थी रस्त्यावर
03:44
Video thumbnail
LIVE-लातुरात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा आमदार रोहित पवार मोर्चात सहभागी
10:07
Video thumbnail
Sanjay Raut On Manoj jarange|जरांगेंच्या उपोषणावर राऊत संतापले; सरकारला सुनावलं!
12:37
Video thumbnail
Dharashiv|उमरगा तालुका दुष्काळग्रस्त घोषित करा! शेतकऱ्यांचा सरकारला इशारा
02:40
Video thumbnail
Latur|लातूर ते कोकण थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी! गणेशोत्सवात प्रवाशांची मोठी सोय
03:46

Latest news