मुंबई : प्रतिनिधी
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीसह त्यांच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या जवळचे मित्र आणि सहकारी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहत आहेत.
महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही नाना पाटेकर यांच्या आठवणींना उजाळा देत सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे. त्यांनी नाना पाटेकर यांना केवळ एक उत्तम कलाकार नव्हे, तर एक असामान्य माणूस आणि जवळचा मित्र असल्याचे म्हटले आहे.
तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, नाना पाटेकर यांच्याशी अवघ्या आठ दिवसांपूर्वी त्यांचे बोलणे झाले होते. हाच आपला शेवटचा संवाद असेल, याची कल्पनाही त्यांना नव्हती. त्या संभाषणाच्या शेवटी नाना पाटेकर यांनी त्यांना, ‘लव्ह यू, बाळा’ असे म्हटले होते. नानांचे हे शेवटचे शब्द आयुष्यभर आपल्या मनात राहतील, असे मुंढे यांनी म्हटले आहे.
‘‘काही माणसं आपल्या आठवणी मागे ठेवून जातात. पण काही माणसं आपल्या आयुष्याचाच एक भाग बनून जातात. नाना त्यापैकीच एक होते,’’ अशा भावना तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केल्या. ‘‘गुडबाय, माझ्या मित्रा. तुझी खूप आठवण येईल आणि तू कायम स्मरणात राहशील,’’ असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
















