सोलापूर : माढा तालुक्यातील शेवरे येथे जमिनीच्या तुकड्यासाठी चुलत्याचा कु-हाडीचा घाव घालून निर्घृण खून करून मुंडके दुचाकीवर घेऊन फिरणा-या नराधमास न्यायालयाने ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यातील दुसरा आरोपी असणा-या त्याच्या भावालाही पोलिसांनी आज अटक केली असून, त्याला देखील ६ दिवसांचीच पोलीस कोठडी देण्यात आली आहे. सोलापूर जिल्हा हादरवून सोडणा-या या धक्कादायक प्रकारामुळे जमिनीच्या तुकड्यासाठी किती टोकाचे वाद होऊ शकतात हे महाराष्ट्राला पाहायला मिळाले.
जमिनीच्या वादातून वृद्ध चुलत्याचा सावत्र पुतण्याकडून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे, हत्या करून धडावेगळे केलेले मुंडके घेऊन आरोपी गाडीवरून फिरत होता. याचवेळी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. या घटनेने सोलापूर जिल्हा हादरून गेला आहे. शंकर प्रल्हाद जाधव (वय ६५ वर्ष) असे हत्या करण्यात आलेल्या शेतक-याचे नाव असून, या प्रकरणी शिवाजी बाबासाहेब जाधव, परमेश्वर बाबसाहेब जाधव, आकाश बाबासाहेब जाधव आणि अजित बाबासाहेब जाधव यांच्या विरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तर, या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोनही आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यान ६ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
स्वत: पोलिसांना शरण आला….
पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आरोपीचा शोध सुरु केला. तर, पोलीस मागे लागले असल्याचे कळताच घाबरलेल्या शिवाजीने आपली दुचाकी अकलूजच्या दिशेने वळवली. तसेच, आता पोलीस आपल्याला पकडतील याची जाणीव होताच तो अकलूजच्या दिशेने निघाला. तसेच दुचाकी आणि सोबत आणलेल्या चुलत्याचे मुंडके घेऊन शिवाजीने अकलूज पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांसमोर शरणागती पत्करली.