मुंबई: प्रतिनिधी
शरद पवार यांच्या पक्षाने त्यांच्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. या यादीत शरद पवार यांनी एकूण पाच जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीत पंढरपूरच्या जागेसाठी लढत सुरू होती. या जागेवर आधीच काँग्रेस पक्षाने आपला उमेदवार जाहीर केला आहे.
यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार यांनी तानाजी सावंत यांचे पुत्र अनिल सावंत यांची उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसने भगीरथ भालके यांची उमेदवारी जाहीर केली आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने आतापर्यंत ८७ जागांसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. शरद पवारांची ही शेवटची यादी असू शकते
शरद पवार गटातील ४५ उमेदवारांची पहिली यादी २४ ऑक्टोबरला जाहीर करण्यात आली.तर २२ उमेदवारांची दुसरी यादी २६ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली. ९ उमेदवारांची तिसरी यादी २७ ऑक्टोबरला जाहीर झाली. ७ उमेदवारांची चौथी यादी २८ ऑक्टोबरला जाहीर करण्यात आली. त्यानंतर आज (२९ ऑक्टोबर) शेवटची पाचवी यादी आज 5 उमेदवारांची यादी जाहीर झाली आहे. शरद पवार यांनी आतापर्यंत ८८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.
पाचव्या यादीतील उमेदवार
माढा मतदारसंघ – अभिजीत पाटील
मुलुंड मतदारसंघ – संगिता वाजे
मोर्शी मतदारसंघ – गिरिष कराळे
पंढरपूर मतदारसंघ – अनिल सावंत
मोहोळ मतदारसंघ – राजू खरे