23.1 C
Latur
Saturday, September 28, 2024
Homeसोलापूरमाढा तालुक्यातील शिक्षकाचा नीट परीक्षा घोटाळ्यात सहभाग

माढा तालुक्यातील शिक्षकाचा नीट परीक्षा घोटाळ्यात सहभाग

माढा : नीट परीक्षा घोटाळा प्रकरणात लातुरच्या दोन जि.प. उपशिक्षकांचा समावेश असल्याने त्यांच्यावर दहशतवादविरोधी पथकाच्या पोलिसांकडून गुन्हा दाखल केला गेला आहे. यातील संजय तुकाराम जाधव हा माढा तालुक्यातील टाकळी (टे) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत उपशिक्षक म्हणून गेल्या वर्षभरापासून काम करीत आहे. उपशिक्षकाचे नाव नीट परीक्षा कनेक्शनमध्ये आल्याने माढा तालुक्याच्याच नव्हे तर जिल्ह्याच्या शिक्षण विभागात एकच गोंधळ उडाला, संबंधित शिक्षकाची लातूर येथे चौकशी होऊन गुन्हा दाखल करण्यात आला असला तरी अद्यापपर्यंत येथील शिक्षण विभागात त्याबाबत अधिकृतरीत्या कोणताही अहवाल पोलिसांकडून आला नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी, लातूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील उपशिक्षक संजय तुकाराम जाधव व त्याचा मित्र उपशिक्षक जलीलखां उमरखान पठाण हे दोघेजण पैसे घेऊन नीट परीक्षा उत्तीर्ण करण्याचे रॅकेट चालवत असल्याची माहिती एटीएस पथकाला समजल्यानंतर ते लातूरमध्ये दाखल झाले आणि संबंधित दोघांची पडताळणी व चौकशी केली आणि त्यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला, संशयित आरोपी उपशिक्षक संजय जाधव हा २६ जून २०२३ पासून माढा तालुक्यातील टाकळी (टे) प्राथमिक शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे.

त्याअगोदर ती सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील मांगेली देऊळ जिल्हा परिषद शाळेत शिक्षण सेवक म्हणून १० सप्टेंबर २००३ रोजी शाळेत हजर होऊन नियुक्त झाला होता. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातच सावंतवाडी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळा महुरे नंबर ३ शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत होता आणि तेथून तो २ मे २०२३ रोजी कार्यमुक्त होऊन टाकळी टें. (ता. माढा) येथे रुजू झाला होता. तो आजपर्यंत तेथील शाळेवरच कार्यरत आहे.नुकत्याच झालेल्या शिक्षकांच्या बदलीमध्ये त्याने आपली पत्नी मनोरुग्ण असल्याचे
दाखवून अक्कलकोट तालुक्यात बदली करून घेतल्याचे सांगण्यात आले. परंतु, अजून त्याला टाकळी (टे.) येथून कार्यमुक्त करण्यात आलेले नाही. मात्र यंदा १५ जून रोजी शाळा सुरु झाल्यापासून तो येथील त्याच्या जिल्हा परिषद शाळेवर फिरकला नसल्याचे त्याच्या गैरहजरीवरून दिसून आले आहे.

दहा हजार रुपये मानधन देऊन पौटशिक्षकाची नेमणूक करून नीट परीक्षा घोटाळ्यातील संशयित शिक्षक संजय जाधव हा लातूरमध्ये क्लासेस घेत असल्याची धक्कादायक माहिती संभाजी ब्रिगेडचे पंढरपूर विभाग जिल्हाध्यक्ष सचिन जगताप यांनी काढली आहे. एवढेच नव्हे तर अक्कलकोट तालुक्यात बदलीसाठी पत्नीलाही जाधव यांनी मनोरुग्ण दाखविले असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. याबाबत त्या शिक्षकाची चौकशी करण्याची मागणीचे निवेदनाद्वारे जगताप यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्याकडे केली आहे.

टाकळी (टे) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील संजय जाधव या उपशिक्षकाचे नाव नीट परीक्षा घोटाळा कनेक्शनमध्ये असल्याचे प्रसार
माध्यमातूनच ऐकले आहे. याबाबत मात्र अधिकृतरीत्या आमच्याकडे पोलिसांकडून कोणताही अह‌वाल अद्यापपर्यंत प्राप्त झालेला नाही.असे माढ्याचे गटशिक्षणाधिकारी विकास यादव यांनी सांगीतले.प्राथमिकचे शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी त्या संजय जाधव याच्या सिक्षकाची माहिती गटशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत मागविली आहे. त्यासंदर्भातील पात्र कादर शेख यांनी कावले आहे. दोन ते तीन दिवसात अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. पोलिसांकडून अद्याप कोणत्याही प्रकारची विचारणा झाली नसल्याचे शेख यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR