इंदूर : मध्य प्रदेशातील निकालाला सहा दिवस उलटले तरी भाजपला राज्याचा मुख्यमंत्री निवडता आलेला नाही. आता यासाठी सोमवारपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. भोपाळमध्ये सोमवारी विधिमंडळ पक्षाची बैठक होणार असून त्यासाठी केंद्रीय निरीक्षकांची नियुक्ती शुक्रवारी करण्यात आली आहे. भाजपने हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर, के. लक्ष्मण आणि आशा लाक्रा यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. ही बैठक ११ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. या बैठकीनंतर निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सामील असलेले नेते दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. तसेच या शर्यतीत असलेले प्रल्हाद पटेल दिल्लीहून भोपाळला परतले आहेत. याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे. या विलंबाचे कारण सध्या सुरू असलेले संसदेचे अधिवेशन आहे, असे ते म्हणाले. तसेच स्वत: मुख्यमंत्री होण्याबाबत त्यांनी काहीही सांगितले नाही मात्र राज्याला पहिल्या क्रमांकाचे राज्य बनवण्यात कोणतीही कसर सोडली जाणार नाही, असे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री निवडीसाठी १९ वर्षांनंतर पहिल्यांदाच केंद्रीय निरीक्षक राज्यात पाठवले गेले आहेत.
शिवराज सिंह प्रचारासाठी रवाना
विशेष म्हणजे, मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान राज्यातील त्या भागात जाणार आहेत जिथे पक्षाला काँग्रेसकडून पराभवाचा सामना करावा लागला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी रवाना झाल्याचे शिवराज सिंह चौहान यांनी माध्यमांना सांगितले आहे. ते म्हणाले की, “मामा आणि भावापेक्षा कोणतेही उच्च पद नाही.