सोलापूर : माघवारी निमित्त पंढरपूरला सोलापूर मोहोळ मार्गे-पंढरपूर पायी चालत जाणा-या दिंडीचे रिंगण व्हावे हा संकल्प करून भाविक वारकरी मंडळचे माध्यमातून पेनूर येथे तीन वर्ष झाले प्रयत्न सुरु आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखीचे प्रमुख उपस्तिथी मध्ये माघ शुद्ध अष्टमीला महात्मा गांधी विद्यालय, पेनूर ता. मोहोळ येथे गोल रिंगण सोहळा संपन्न झाला. दिपक नरोटे यांचे अश्व रिंगणसाठी आणले होते.
भारत चवरे महाराज, नागनाथ शिंदे महाराज, शत्रुघ्न चवरे यांचे हस्ते अश्व पूजन व सरपंच सुजित अवारे, सागर चवरे उप सरपंच यांचे हस्ते पालखी पूजन करण्यात आले. तदनंतर मान्यवर व दिंडी प्रमुख यांचा सन्मान करण्यात आला.
काया, वाचा, मने, जीवे समर्पण करुन पंढरीला जाणारे वारकरी पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे हा अधिकार वारकरी भाविकांचा असल्याने ते भजनामध्ये दंग होऊन नाचत होते. त्या सर्वांनी पाऊल खेळले. नंतर रिंगण लाऊन घेतले व ध्वजाधारी रिंगण पूर्ण झाले. तुळशी वृंदावन धारी महिला व मृदंग वादकांचे रिंगण झाले. विणेकरी महाराजांचे रिंगण पूर्ण झाले नंतर शेवटी अश्व रिंगाणासाठी धावपट्टी आले आणि मैदानातील वातावरण बदलून गेले.
अश्व रिंगण खूपच उत्साहपूर्ण झाले आणि सर्व वारकरी भाविक पंढरीकडे मार्गस्थ झाले. हा सर्व सोहळा सुधाकर इंगळे महाराजचे मार्गदर्शनाने संपन्न झाला. जोतिराम चांगभले (प्रदेश अध्यक्ष), किसन कापसे (प्रदेश उपाध्यक्ष ), संजय पवार (शहर अध्यक्ष ), इ च्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला व महेश चवरे, बळीराम चवरे इ. नी परिश्रम घेतले. पेनूर परिसरातील महिला व पुरुष भाविक उपस्थित होते.