32.7 C
Latur
Thursday, March 13, 2025
Homeलातूरमहाबँक कर्मचा-यांचे धरणे आंदोलन

महाबँक कर्मचा-यांचे धरणे आंदोलन

नोकर भरतीसाठी देशभरात क्षेत्रीय कार्यालयासमोर धरणे २० मार्च रोजी देशव्यापी आंदोलन

लातूर : आज महा बँकेतील कर्मचा-यांनी आंदोलनाचा एक कार्यक्रम झोनल ऑफिस समोर धरणे या अंतर्गत महा बँकेच्या लातूर स्थित औसा रोड येथील येथील झोनल ऑफिस समोर दुपारी १२ ते सायंकाळी ५ पर्यंत धरणे धरली व सायंकाळी पाच वाजता स्थानिक इतर बँकेतील कर्मचा-यांच्या सहभागातून प्रखर निदर्शने केली ज्यात ५० पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. दरम्यान येत्या २० मार्च रोजी देशव्यापी आंदोन करण्यात येणार आहे.

यानंतर सभासदांना संबोधित करताना संघटनेचे नेते कॉम्रेड दीपक माने यांनी सांगितले की आजच्या दिवशी क्लार्कच्या दोन हजार, शिपायांच्या एक हजार तर सफाई कामगारांच्या पंचवीसशे जागा रिकाम्या आहेत त्या त्वरित भरण्यात याव्यात अशी संघटनेची मागणी आहे ज्याचा केवळ कर्मचा-यांनाच त्रास होत नाही तर ग्राहकसेवेवर देखील त्याचा विपरीत परिणाम होत आहे. या शिवाय यामुळे बँकेत फ्रॉड देखील होत आहेत.

याशिवाय बँक व्यवस्थापन कर्मचा-यांशी संबंधित प्रश्नावर मान्यताप्राप्त संघटनेशी चर्चा न करता कायदे धाब्यावर बसवून मनमानी निर्णय घेत आहे. ज्यावर संघटनेने तीव्र आक्षेप घेतला आहे. महा बँकेच्या धरणे कार्यक्रमाला पाठिंबा दर्शविण्यासाठी शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील कुमार हाके सर, ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनंत सूर्यवंशी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉमेड संजय मोरे, आम आदमी पक्षाचे कॉम्रेड विक्रांत शंके, ग्रामीण बँक अधिकारी संघटनेचे कॉम्रेड राहुल सावंत व कॉम्रेड प्रीतम गिरी गोसावी , ए आय बी ई ओ चे कॉम्रेड विवेक पदरे, नोबोचे संतोष मोलगे इत्यादी सर्वांनी उपस्थित समुदायास मार्गदर्शन करून कर्मचा-यांच्या न्याय मागण्यासाठी त्यांच्या संघटनांचा व पक्षांचा पाठिंबा बँक ऑफ महाराष्ट्र मधील कर्मचा-यांच्या संघटनेस जाहीर केला. महाबँकेच्या ग्राहकांनी आमची भूमिका समजून घ्यावी आणि आमच्या संपाला पाठिंबा द्यावा असे संघटनेतर्फे नम्र आवाहन करण्यात आले आहे. हा धरणे कार्यक्रम यशस्वी करण्यात कॉम्रेड महेश घोडके, कॉम्रेड गजानन औटी, कॉम्रेड उदय मोरे , कॉ.सुधीर मोरे इत्यादींनी परिश्रम घेतले.

बँक ऑफ महाराष्ट्र मधील देशभरातील एआयबीइएचे सभासद २० मार्च रोजी एक दिवसाच्या देशव्यापी संपावर जात आहेत. हा संप प्रामुख्याने सर्व स्तरातील कर्मचा-यांच्या भरतीसाठी आहे. बँकेने २०२१ मधे सफाई कर्मचारी हे पदच रद्द केले. हे काम आऊटसोर्स केले. त्यांना किमान वेतन देखील दिले जात नाही. कायम स्वरुपी कामगारांचे फायदे जसे की रजा, मेडिकल, सुट्या काहीच मिळत नाही. या पदावर अनेक वर्षांपासून तात्पुरत्या पदावर काम करणारे हजारो कर्मचारी यामुळे रस्त्यावर आले आहेत. बँकेत ७०० शाखेतून नियमित शिपाई नेमण्यात आलेले नाहीत. बँकेत ३१८ शाखा आहेत जेथे एकही क्लार्क नेमण्यात आला नाही.

१२९० शाखा आहेत जेथे केवळ एक क्लार्क आहे. जो कॅश मध्ये काम करतो. यामुळे कर्मचा-यांना वेळ संपली तरी जास्त वेळ बसून काम पूर्ण करून जावे लागते. सुटीच्या दिवशी कामावर यावे लागते. आजारपण असो की सांसारिक जबाबदा-या यासाठी आवश्यकतेनुसार राजा मिळत नाही. काम आणि वैयक्तिक आयुष्य यातील समतोल बिघडला आहे. कर्मचारी सतत ताण-तणावात काम करत आहेत. त्यामुळे सतत आजारी पडत आहेत असे बँक कर्मचा-यांचे नेते कॉम्रेड उत्तम होळीकर म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले की या सर्व गोष्टींचा ग्राहक सेवेवर देखील विपरीत परिणाम होत आहे. एकीकडे ग्राहकांची संख्या वाढली आहे , त्यांच्या आपेक्षा वाढल्या आहेत तर दुसरीकडे कर्मचा-यांची संख्या मात्र कमी झाली आहे. यासाठीच कर्मचा-यांचा आग्रह आहे की बँकेने त्वरित सर्व स्तरातील कर्मचा-यांची पुरेशी भरती करावी. याशिवाय कमी कर्मचा-यात अधिक काम, यात बँकेचे नियम काटेकोरपणे पाळल्या जात नाहीत आणि त्यातूनच फ्रॉडस होण्याची शक्यता निर्माण होते न्हवे होत आहेत. यात बँकेचे तसेच ग्राहकांचे नुकसान होत आहे. याला जबाबदार कोण ? बँक यावर संवेदनशील नाही म्हणूनच २० मार्चला महा बँकेत संप अटळ बनला आहे. या शिवाय बँक कर्मचारी संघटनांशी केलेले करार, हायकोर्टाचे आदेश सगळेच धाब्यावर बसवून बँक व्यवस्थापन मनमानी करत आहे. यामुळे कर्मचा-यात संतापाची भावना निर्माण झाली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR