25.6 C
Latur
Monday, September 23, 2024
Homeमहाराष्ट्रपुढील वर्षी महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर

पुढील वर्षी महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे आश्वासन

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी येथे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले. यावेळी उपस्थित असणा-या लाखो अनुयायींना एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिले.

पुढील वर्षी महापरिनिर्वाण दिन इंदू मिल स्मारकावर साजरा करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. जगाला हेवा वाटेल असे हे स्मारक असणार आहे. अनेक कल्याणकारी योजना राबवत आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले. डॉ. आंबेडकर यांचे भव्य असे स्मारक इंदू मिलच्या जागी उभारले जात असून हे काम वेळेत पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे एकनाथ शिंदेंनी यावेळी सांगितले.

डॉ. आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये केलेले काम भारताच्या निर्मितीचे पहिले पाऊल ठरले आहे. त्यामुळेच आपण त्यांना महामानव म्हणतो, कारण जिथे लोकांचे विचार संपतात तिथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार सुरू व्हायचे आणि म्हणूनच आज देशाच्या या वाटचालीमध्ये त्यांचा इतका मोलाचा वाटा आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. मला या गोष्टीचे समाधान आहे, ज्या वर्षी इंदू मिलवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक व्हावे अशा प्रकारची मागणी झाली होती, त्यावेळेस मला मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी पंतप्रधान मोदीजींना आम्ही विनंती केली आणि इंदू मिलची जागा आपल्याला मिळाली, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR