22.7 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeराष्ट्रीयमहाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम

महाराष्ट्र एनसीसी संचालनालय देशात प्रथम

नवी दिल्ली : महाराष्ट्र नॅशनल कॅडेट कॉर्प्स अर्थातच एनसीसी संचालनालयाने ‘प्रधानमंत्री बॅनर’ हा प्रतिष्ठित पुरस्कार सलग तिस-यांदा पटकावून देशातील सर्वोत्तम संचालनालयाचा बहुमान पटकविला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शनिवार, दि. २७ जानेवारी रोजी महाराष्ट्राला हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

नवी दिल्ली येथील कॅन्टॉनमेंट भागातील करिअप्पा मैदानावर एनसीसी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ‘प्रधानमंत्री बॅनर’ २०२३-२४ च्या विजेत्या आणि उपविजेत्यासह एनसीसीच्या बेस्ट कॅडेट्सला देखील गौरविण्यात आले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांच्यासह अनेक मान्यवर येथे उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्र एनसीसी संचालनालयास (१२२ कॅडेटचा सहभाग) मेजर जनरल योगेंद्र सिंग यांनी बॅनर स्वीकारला. हे विजेतेपद महाराष्ट्र एनसीसीची कॅडेट काजल सातपुते, नचिकेत मेश्राम, खुशी झा, विवेक गांगुर्डे यांच्यासह संचालनालयाचे अतिरिक्त महासंचालक मेजर जनरल योगेंद्र सिंग (वीएसएम) यांनी प्रधानमंत्री बॅनर स्विकारले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR