22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeक्रीडाखेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राला सर्वसाधारण विजेतेपद

तब्बल १५८ पदकांची कमाई; हरियाणापेक्षाही महाराष्ट्र भारी

चेन्नई : महाराष्ट्रने सलग दुस-या वर्षी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं आहे. महाराष्ट्राने खेलो इंडियाचं मैदान मारत तब्बल ५७ सुवर्ण पदकांवर आपलं नाव कोरलं. याचबरोबर महाराष्ट्रातील युवा खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात ४८ रौप्य आणि ५३ कांस्य पदके देखील पटकावली.

महाराष्ट्राची एकूण पदक संख्या ही १५८ इतकी झाली. आतापर्यंत झोलेल्या सहा खेलो इंडिया स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने तब्बल ४ वेळा सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं. तर खेळांसाठी प्रसिद्ध असलेल्या हरियाणा राज्याने दोनवेळा हा मान पटकावला आहे.

यंदाचे खेलो इंडिया हे तामिळनाडूमध्ये झाले. त्यांनी घरच्या मैदानावर खेळण्या फायदा उचलत ३८ सुवर्ण पदके, २१ रौप्य आणि ३९ कांस्य पदके ंिजकत उपविजेतेपद पटकावलं. त्यांची एकूण पदक संख्या ही ९८ इतकी होती. हरियाणाने एकूण १०३ पदकं ंिजकली होती. मात्र त्यांची सुवर्ण पदकांची संख्या फक्त ३५ असल्याने त्यांना तिस-या स्थानावर समाधान मानावे लागले.

यजमान तामिळनाडू संघाने घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा उठवित ३८ सुवर्ण, २१ रौप्य, ३९ कांस्य अशी एकूण ९८ पदके ंिजकून उपविजेतेपद पटकाविले. हरियाणा संघाला पदक तालिकेत तिस-या स्थानावर समाधान मानावे लागले. त्यांनी ३५ सुवर्ण, २२ रौप्य व ४६ कांस्य अशी एकूण १०३ पदकांची कमाई केली.

जलतरणमध्ये सर्वाधिक पदके

जलतरण – ११ सुवर्ण, १० रौप्य आणि ६ कांस्य – एकूण २७ पदके.

जिम्नॅस्टिक्स – ९ सुवर्ण – एकूण १७ पदके

कुस्ती – ४ सुवर्ण – एकूण १४ पदके

अ‍ॅथलेटिक्स – एकूण १२ पदके

योगासन – एकूण ११ पदके.

जलतरणामध्ये सांघिक विजेतेपद

जलतरणामध्ये महाराष्ट्राने मुले आणि मुली या दोन्ही गटात सांघिक विजेतेपद पटकाविले. शेवटच्या दिवशी महाराष्ट्राच्या ऋषभ दास याने यंदाच्या स्पर्धेतील ५० मीटर फ्रिस्टाईल शर्यत २४.२२ सेकंदात पार केली. याचबरोबर स्पर्धेतील यंदाचे चौथे सुवर्णपदक ंिजकले. पाठोपाठ त्याने महाराष्ट्राला रिले शर्यतीत सुवर्णपदक ंिजकून आपल्या सुवर्णपदकांची संख्या पाच केली.

ऋषभ याने अथर्व संकपाळ, रोनक सावंत आणि सलील भागवत यांच्या साथीत चार बाय शंभर मीटर फ्रिस्टाईल रिले शर्यतीत सुवर्णपदक ंिजकले. ही शर्यत त्यांनी तीन मिनिटे ३५.५२ सेकंदात पूर्ण केली.

मुलींच्या गटात निर्मयी अंबेटकर हिने २०० मीटर बटरफ्लाय शर्यतीत कांस्यपदक ंिजकताना दोन मिनिटे २६.९१ सेकंद वेळ नोंदवली. तिची सहकारी अलिफिया धनसुरा हिने ५० मीटर्स फ्रिस्टाईल शर्यत २७.०७ सेकंदात पार केली आणि सुवर्ण पदक ंिजकले. हिबा चौगुले हिने ५० मीटर्स शर्यतीत रुपेरी कामगिरी करताना ३४.९४ सेकंद वेळ नोंदविली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR