21.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रबलात्काराच्या घटनांत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर

बलात्काराच्या घटनांत महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर

जयंत पाटलांचा हल्लाबोल

नागपूर : राज्यातील बलात्काराच्या घटनांत गेल्या काही दिवसांत वाढ झाली आहे. बलात्काराच्या घटनांत आपले राज्य चौथ्या क्रमांकावर आहे. सत्ता राहिली तर लवकरच पहिल्या क्रमांकावर राहील. महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. सध्या देशात भारतात पहिल्यादांच राम अवतरत आहे की काय असे वातावरण आहे. रामावर एवढेच प्रेम असेल तर सीतामाईचे संरक्षण करा, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी भाजपवर निशाणा साधला आहे. वाढत्या महिला अत्याचारावर चिंता व्यक्त करताना ड्रग्जच्या प्रकरणावर देखील टिप्पणी केली आहे. सध्या उडता पंजाब, उडता महाराष्ट्र झालाय, असे ते म्हणाले.

जयंत पाटील म्हणाले, राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडली आहे. बिहार राज्याला आपण बोलायचो.आता आपल्या राज्यात ती स्थिती आली आहे. घटना घडली तर गुन्हा दाखल करायचा नाही. गुन्हा दाखल झाला तर तपास करायचा नाही, अशी परिस्थिती आहे. सध्या उडता महाराष्ट्र झाला आहे. ललित पाटील प्रकरणात मंत्री त्याला अ‍ॅडमिट करतो, नंतर त्याला पळून जायला मदत करतो.. ही गुन्ह्याची स्थिती आहे.
बीड जाळपोळ प्रकरणावर देखील जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बीडमध्ये घटना घडली त्यावेळी एसपी बीड आणि माजलगाव या ठिकाणी नव्हते. ते फोन बंद करून बसले होते अशी मला माहिती मिळाली. जिल्हाधिकारी यांच्या अहवालात याचा उल्लेख आहे कोणाचा पाठिंबा असल्याशिवाय असे होऊ शकत नाही, असे जयंत पाटील म्हणाले. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीवर देखील जयंत पाटलांनी टिप्पणी केली आहे. जयंत पाटील म्हणाले, एक फोडला आता दुसरा पक्ष फोडता सर्वांना एकाच पक्षात घ्या.

जनतेची फसवणूक सुरू आहे
आपलं सरकार नोटा छापण्याचे काम करत आहे. पुरवण्या मागण्या जाहीर करण्यात आल्या. एक लाख साठ हजार रु. आता राज्याला लागणार आहेत. हे पैसे कुठे गेले तर ते आमदारांच्या कामासाठी निधी देण्यात. प्रलंबित सिंचन योजना राज्यात मोठ्या प्रमाणात आहेत. आमचं सरकार गेल्यावर यांनी काहीच केलं नाही. फडणवीस तुटीचे बजेट मांडतात, दुसरीकडे एक लाख कोटी पुरवणी मागण्या आहेत. आमदारांना कोट्यवधी रुपयांची कामे दिली. निधी नाही, नियोजन नाही जनतेची फसवणूक आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR