महाराष्ट्र राज्य संघास दोन सुवर्ण, रौप्य, कांस्यपदक

सेलू : भारतीय टेनिस व्हॉलीबॉल महासंघाच्या वतीने गाझीपूर उत्तरप्रदेश येथे दि. ३१ डिसेंबर ते दि. २ जानेवारी दरम्यान राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. महाराष्ट्र संघांची सुवर्ण कामगिरी केली. यात सबज्युनियर मुली व मिश्र दुहेरी गटात सुवर्णपदक तर ज्युनिअर मिश्र दुहेरीत रौप्यपदक, तर ज्युनिअर मुली गटात कांस्यपदक पटकावले.

सब-ज्युनिअर मिश्र दुहेरी सुवर्णपदक महाराष्ट्र वि. उत्तरप्रदेश दरम्यान महाराष्ट्र संघाने २-० सेटमध्ये महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक पटकावले. यात रणवीर भोसले (पुणे), सोनाक्षी कदम (पुणे) यांचा सहभाग होता. त्यांचे प्रशिक्षक निनाद रहाटे (सबब मुंबई) आहेत. सब – ज्युनिअर मुली सुवर्णपदक विजेता अंतिम सामना महाराष्ट्र वि. झारखंड दरम्यान महाराष्ट्र संघाने २-० सेट मध्ये उत्तरप्रदेशचा पराभव करत महाराष्ट्र संघाने सुवर्णपदक पटकावले. यात तनुजा रांजणे (पुणे) सृष्टी शिंदे वैष्णवी माने (सांगली) अवनी कांबळे, (नाशिक) प्रांजल सूर्यवंशी, चैताली चौधरी (जळगाव) यांचा सहभाग होता. यात प्रशिक्षक मिलिंद कुलकर्णी होते. ज्युनिअर मुली कांस्यपदक पदासाठी महाराष्ट्र वि. दिल्ली दरम्यान अतितटीच्या सामन्यात २-१ सेट मध्ये महाराष्ट्र संघाने कांस्यपदक पदक पटकावले. यात मधुरा हवलदार, किर्ती सोळांकुरकर (सांगली) सुलशा कपासी, श्रावणी वळंजू (सबब मुंबई) नीतूकांवर चौहान (छ.संभाजीनगर), गायत्री गायके (परभणी) यांचा सहभाग होता. प्रशिक्षक मिलिंद कुलकर्णी (सांगली) यांचे मार्गदर्शन लाभले.

मिश्र दुहेरी ज्युनिअर रौप्यपदकासाठी अंतिम सामना हिमाचल प्रदेश वि. महाराष्ट्र दरम्यान हिमाचल प्रदेश संघाने महाराष्ट्र संघाचा २-०, हिमाचल प्रदेश सुवर्णपदक तर महाराष्ट्र संघास रौप्यपदक पटकावले. यात सार्थक माळकर (परभणी), तपस्वी पगारे (नाशिक) यांचा सहभाग होता. प्रशिक्षक निनाद रहाटे यांचे मार्गदर्शन लाभले. ज्युनिअर मुले चौथा क्रमांक पटकावला यात नील मयेकर (सबब मुंबई) मयूर बोरसे, प्रतीक बच्छाव (नाशिक), प्रसाद महाले (परभणी) रोशन चव्हाण (जळगाव) पवन खांडगे (छ.संभाजीनगर), सब ज्युनिअर मुले चौथा क्रमांक विवेक सिंह, करण जाधव (ठाणे)आर्यन गायके (परभणी), गौरव चौधरी (मुंबई शहर) दत्तात्रय कळसकर, राज आळंजकर (छ.संभाजीनगर) यांनी पटकावला.

यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन टेनिस व्हॉलीबॉलचे जनक डॉ. व्यंकटेश वांगवाड, राज्य अध्यक्ष सुरेश रेड्डी क्यातमवार, राज्य सचिव गणेश माळवे, राज्य कार्याध्यक्ष डॉ आबासाहेब सिरसाठ, उपाध्यक्ष आनंद खरे, रामेश्वर कोरडे, किशोर चौधरी, राज्य कोषाध्यक्ष डॉ.दिनेश शिगारम, जिल्हा सचिव सतीश नावाडे, प्रा.नागेश कान्हेकर, विभागीय सचिव प्रमोद महाजन आदींनी शुभेच्छा दिल्या.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
22:40
Video thumbnail
Dharashiv|उमरग्यात मराठा आंदोलकांचा उद्रेक! तहसीलदारांची खुर्ची पेटवली; 4 जण ताब्यात
02:51
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये पावसाने ओढ दिली! कोरडा दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादीची मोठी मागणी
02:05
Video thumbnail
Latur|लातूरच्या सदानंद विद्यालयात ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा आरोप!
05:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये नाभिक समाजाचा गौरव सोहळा; जिल्हाभरातून समाजबांधवांची उपस्थिती
02:27
Video thumbnail
Latur|‘तुम से ना हो पायेगा’! अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; लातूरमध्ये शिवसेनेचं आंदोलन
07:57
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्याने मराठा आंदोलक संतप्त; हदगावमध्ये बॅनर फाडले
00:33
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्यानंतर आंदोलनाची धार वाढली? बरडशेवाळ्यात मराठा समाजाचा रास्ता रोको
00:33
Video thumbnail
Nanded|उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवला! पावसाअभावी नांदेडच्या शेतकऱ्याची हतबलता
02:06
Video thumbnail
Nanded|मराठवाड्याचा मुक्ती संग्राम पाठ्यपुस्तकात घ्या! नांदेडमधून शासनाकडे मोठी मागणी
03:26
Video thumbnail
Latur|हातातोंडाशी आलेला घास गेला! लातूरमध्ये पाण्याअभावी उभी पिकं करपली
03:42
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
07:57
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
10:46
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
19:02
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
16:29

Latest news