30.9 C
Latur
Saturday, May 10, 2025
HomeUncategorizedमहाविकास आघाडी ३५ जागा जिंकेल

महाविकास आघाडी ३५ जागा जिंकेल

नागपुर : येत्या ०४ जून रोजी जो निकाल येईल, त्यानंतर अनेकजण जे आमच्यापासून दुर गेले होते. ते पुन्हा येण्यासाठी प्रयत्न करू शकतात. असा दावा शरद पवार गटातील माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. तसेच, मात्र आमच्या पक्षाने ठरवलं आहे की, जे आम्हाला कठिण काळात सोडून गेले, त्यांना पुन्हा पक्षात घ्यायचं नाही. ०४ जूननंतर काय होईल ते पाहा. असाही इशारा अनिल देशमुख यांनी दिला आहे.

४ जूननंतर रोजी लागणा-या निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या आधी आमच्या पक्षात येणा-यांच्या रांगा लागल्याशिवाय राहणार नाहीत. तसेच ०४ जूननंतर महाराष्ट्रात चमत्कार घडणार असून महाविकास आघाडी ३५ जागा जिंकेल, असेही ते म्हणाले. यातच अनिल देशमुख यांनी त्यांच्या निवासस्थानी महाराष्ट्रात चमत्कार घडेल असा बोर्डही लावला आहे.

त्यावर ते बोलत होते. दरम्यान, पहिल्या आणि दुस-या टप्प्यात विदर्भात निवडणुका झाल्या. त्यामुळे मी आधी विदर्भात चमत्कार घडेल असा बोर्ड लावला होता. त्यानंतर जेव्हा महाराष्ट्रातील पाचही टप्प्यातील निवडणुका झाल्या. त्यानंतर ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रामध्ये दिसत आहे. त्यामध्ये महागाईचा प्रश्न, बेरोजगारीचा प्रश्न, शेतक-यांचा प्रश्न, कापूस, सोयाबीन, कांदा, संत्रा असे अनेक प्रश्न होते. त्यामुळे ज्या प्रकारचे वातावरण महाराष्ट्रात होतं. या अनुषंगाने महाराष्ट्रात चमत्कार घडणार अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळे हा बोर्ड लावला आहे. हा चमत्कार आकड्याच्या भाषेत सांगायचं झालं तर ३५ पेक्षा जास्त जागा महाविकास आघाडीच्या येतील. असा दावाही त्यांनी केलाय.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR