मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीने जोर धरला असून वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच महाराष्ट्र विधानसभा निवडणूक-२०२४ साठी ग्राउंड झिरो मेगा प्री-पोलचा सर्व्हे समोर आला आहे. या सर्व्हेमध्ये महाविकास आघाडीचे पारडे जड असून महाविकास आघाडीला तब्बल १५७ जागा मिळण्याची शक्यता असल्याने मविआचे पारडे जड आहे. तर महायुतीला केवळ ११७ जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे दिसून येत आहे.
महायुतीमध्ये शिंदेसेने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असून त्यांना विधानसभा २०२४ च्या निवडणुकीत केवळ २३ जागा मिळणार असल्याचे दिसून येत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला १४ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महायुतीत पुन्हा एकदा सर्वांधिक जागा भाजपला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान महाविकास आघाडीत काँग्रेस मुसंडी मारण्याच्या तयारीत दिसून येत असून काँग्रेसला ६८ जागा तर राष्ट्रवादी शरद पवार ४४ आणि शिवसेना उबाठाला ४१ जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आला आहे. महाविकास आघाडीतील मित्रपक्षांनाही ४ जागा मिळण्याची शक्यता असल्याचे सर्व्हेमधून दिसून येत आहे.
सर्व्हेचे निष्कर्ष खालीलप्रमाणे आहेत:
मविआ – १५७
– काँग्रेस : ६८
– राष्ट्रवादी-शप : ४४
– शिवसेना यूबीटी : ४१
– एसपी : ०१
– सीपीआय-एम : ०१
– पीडब्ल्यूपी : ०२
महायुती – ११७
– भाजप : ७९
– शिंदेसेना : २३
– राष्ट्रवादी-अजित पवार : १४
– आरवायएसपी : ०१
इतर : १४