22.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रमहायुतीचा मुख्यमंत्री ठरला!

महायुतीचा मुख्यमंत्री ठरला!

शिराळ्यातील सभेत अमित शहांनी दिले संकेत

शिराळा : विशेष प्रतिनिधी
राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुतीकडून महाराष्ट्रात ठिकठिकाणी जोरदार प्रचारसभांचे आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज धुळ्यात तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सांगलीतील शिराळ्यात पहिली सभा पार पडली. यावेळी अमित शाह भाषणादरम्यान आगामी मुख्यमंत्रि­पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबद्दलचे संकेत दिले. तसेच त्यांनी जाहीरपणे भाष्य केले.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार याची सातत्याने चर्चा सुरु आहे. त्यातच महायुती किंवा महाविकास आघाडी दोघांनीही अद्याप मुख्यमंत्रि­पदासाठीचा चेहरा जाहीर केलेला नाही. नुकतीच सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील जाहीर सभेत अमित शहा यांनी महायुतीच्या मुख्यमंत्रीपदासाठीचा चेहरा कोण असणार? याबद्दल भाष्य केले आहे.

महाराष्ट्राच्या जनतेची हीच इच्छा
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन करण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना मतदान करा. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. आपण सर्वांनी निर्णायक भूमिका बजावली पाहिजे. मी दोन महिन्यांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा आणायचे आहे. महाराष्ट्रातील जनतेचीही हीच इच्छा आहे, असे अमित शाह यांनी म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR