15.6 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रमहायुतीचे नेते अमित ठाकरेंना पाठिंबा देणार?

महायुतीचे नेते अमित ठाकरेंना पाठिंबा देणार?

मुंबई : माहीम विधानसभा मतदारसंघ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. माहीम विधानसभा मतदारसंघातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांचे पुत्र अमित ठाकरे यांना उमेदवार दिली आहे. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेने विद्यमान सदा सरवणकर यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवले आहे. याशिवाय ठाकरेंच्या शिवसेनेने महेश सावंत यांना संधी दिली आहे. दरम्यान, राज ठाकरेंचे पुत्र पहिल्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानंतर महायुतीमधील काही नेत्यांचा त्यांना पाठिंबा देण्याचा सूर आहे. दरम्यान, सदा सरवणकर यांनी या संदर्भात पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सदा सरवणकर म्हणाले, आशिष शेलार आणि राज साहेबांची एक चांगली मैत्री आहे. आता मैत्रीसाठी त्यांनी जर काहीतरी स्वतंत्र बोलले असतील तर तो त्यांचा भाग आहे. मी सोमवारी जाऊन अर्ज भरणार आहे. केसरकर साहेब मी कधीकधी भेटत असतो. एकनाथ शिंदेंवर माझा विश्वास आहे. त्यांनी एबी फॉर्म दिला आहे. महायुतीचा उमेदवार म्हणून आमचा मेळावाही झाला. निवडणूक अर्ज भरू नका म्हणून माझ्यासाठी एकही फोन नाही. मला कोणाचीही अद्याप विनंती नाही, असेही सदा सरवणकर यांनी स्पष्ट केले.

पुढे बोलताना सदा सरवणकर म्हणाले, मी लढणारा शिवसैनिक आहे. मी मागच्या दरवाज्याने येणार नाही. मी लढणारा कार्यकर्ता आहे. माझ्यावर कोणताच प्रेशर नाही. मी लोकांना सहज भेटणारा लोकप्रतिनिधी आहे. मी ३० वर्ष केलेले काम हे विजयी करण्यासाठी भरपूर आहे. माझ्या विभागात शिवसेना मोठी झाली पाहिजे. मी जनतेचा आशीर्वाद घेणार आहे. शेलार माझे चांगले मित्र आहेत, राज ठाकरेंचीही मैत्री आहे. मात्र युतीधर्म आहे. आम्ही एकनाथ शिंदे यांच्यावर पुर्ण विश्वास टाकलाय. ते नक्की विचार करतील. संघर्षातून आम्ही शिवसेना उभी केली आहे. मी निवडणूक लढवणार आणि माघार घेणार नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR