सोलापूर : मैत्रा फाउंडेशनचा बीड येथून या वर्षाचा शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सौ. वनिता रामचंद्र गवळी-घोडके यांना मिळाला. बीड शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे हा सोहळा पार पडला. महाराष्ट्रातील ३५ साहित्यिक शिक्षकांना त्यांचे शैक्षणिक कार्यातील कामगिरीबद्दल तसेच साहित्य सेवेचा आराखडा घेऊन आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
मैत्रा फाउंडेशनचे संस्थापक द.ल. वारे, जिल्हाध्यक्ष संजय राठोड व त्यांचे सर्व पदाधिकारी, बीड जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी, जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील सामाजिक लोक तसेच कला साहित्यिक सामाजिक उपक्रम राबविणारे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण सोहळा पार पडला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोली काटी तालुका मोहोळ येथील मुख्याध्यापकांसह, सर्व शिक्षक स्टाफ, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, हितचिंतक मित्रपरिवारासह सोलापूर शहरातील साहित्यिक कविवर्य कवयित्री यांनी अभिनंदन केले.
साहित्यिका संध्या धर्माधिकारी अंजना गायकवाड, संध्या हेब्बाळकर, रेणुका बुधाराम स्वाती इराबत्ती, कविता आसादे, महानंदा विभुते राजश्री जाधव, साहित्यिक रामप्रभू माने नरेंद्र गुंडेली डी.एन.जमादार, दत्तात्रय इंगळे, जमालोद्दिन शेख, जावेद शेख यांनी पूरस्काराबद्दल शुभेच्छा दिल्या.