23.9 C
Latur
Thursday, January 23, 2025
Homeराष्ट्रीयकाँग्रेसमध्ये मोठे फेरबदल

काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल

१२ सरचिटणीस, १२ राज्य प्रभारी नियुक्त

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये शनिवारी मोठे फेरबदल झाले आहेत. राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांची पक्षाच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांना छत्तीसगडचे प्रभारी बनवण्यात आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आपल्या टीममध्ये मोठा बदल करत १२ सरचिटणीस आणि १२ राज्य प्रभारी नियुक्त केले आहेत.

पक्षाचे संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रियंका गांधी यांना सरचिटणीसपदावर कायम ठेवण्यात आले असून त्यांना कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही. प्रियंका गांधी गेली पाच वर्षे उत्तर प्रदेशच्या प्रभारी म्हणून काम करत होत्या. आता प्रियंका गांधी यांच्या जागी पक्षाचे सरचिटणीस अविनाश पांडे यांची उत्तर प्रदेशचे नवे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

केसी वेणुगोपाल हे काँग्रेसचे संघटन सरचिटणीस राहतील आणि सरचिटणीस जयराम रमेश हे पक्षाच्या संपर्क विभागाची जबाबदारीही सांभाळतील. अजय माकन हे पक्षाच्या खजिनदारपदी कायम राहणार आहेत. त्यांच्यासोबत मिलिंद देवरा आणि विजय इंदर सिंघला या दोन नेत्यांना संयुक्त कोषाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

रणदीप सिंग सुरजेवाला यांच्याकडून मध्य प्रदेशची जबाबदारी परत घेण्यात आली आहे. आता ते फक्त कर्नाटकचेच प्रभारी असतील. त्यांच्या जागी जितेंद्र सिंह यांच्याकडे मध्य प्रदेशच्या प्रभारीपदाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. जितेंद्र सिंग आधीच आसामचे प्रभारी आहेत. सरचिटणीस कुमारी सेलजा यांना छत्तीसगडमधून हटवून उत्तराखंडच्या प्रभारीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सुखजिंदर सिंग रंधावा राजस्थानचे प्रभारी राहतील.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR