29 C
Latur
Friday, January 24, 2025
Homeराष्ट्रीयलोकसभेपूर्वी कॉंग्रेस पक्ष संघटनेत मोठा फेरबदल

लोकसभेपूर्वी कॉंग्रेस पक्ष संघटनेत मोठा फेरबदल

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस संघटनेत आज मोठे फेरबदल करण्यात आले. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांच्या जागी अविनाश पांडे यांना यूपी काँग्रेसचे प्रभारी बनवण्यात आले आहे. आता प्रियंका गांधी यांच्याकडे कोणत्याही राज्याची जबाबदारी नाही. त्याचबरोबर सचिन पायलट यांच्याकडे छत्तीसगडची जबाबदारी देण्यात आली आहे. कुमारी सैलजा यांच्या जागी पायलट यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच महाराष्ट्रालाही प्रभारी मिळाले असून, रमेश चेनिथल्ला यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे.

यासोबतच मोहन प्रकाश यांना बिहारचे प्रभारी बनवण्यात आले आहे. के. सी. वेणुगोपाल हे सध्या संघटनेचे सरचिटणीस असतील. ज्येष्ठ नेते मुकुल वासनिक यांना गुजरातचे प्रभारी तर रणदीपसिंह सुरजेवाला यांच्याकडे कर्नाटकची जबाबदारी देण्यात आली आहे. कर्नाटकमध्ये एच. के. पाटील मंत्री झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यांपासून महाराष्ट्राचे प्रभारीपद रिक्त होते. यानंतर आता रिक्त पदावर रमेश चेनिथल्ला यांची नियुक्ती केली आहे. महाराष्ट्र आणि मुंबईसाठी चेन्नीथल्ला प्रभारी म्हणून काम पाहतील.

संघटनात्मक पुनर्रचनेसोबतच काँग्रेस आपला पाया मजबूत करण्यासाठी तळागाळात अनेक पावले उचलण्याचा विचार करत आहे. पक्षातील फेरबदल हे मे २०२४ पूर्वी होणा-या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाला संजीवनी देण्याचा प्रयत्न म्हणून पाहिले जात आहे.

अजय माकन एआयसीसीचे कोषाध्यक्ष
ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांची कम्युनिकेशनच्या प्रभारी सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर अजय माकन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष असतील. पक्षाने १२ सरचिटणीस आणि ११ राज्य प्रभारी नियुक्त केले आहेत. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षातील हा महत्त्वपूर्ण फेरबदल मानला जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR