22.3 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeपरभणीनुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करा : जिल्हाधिकारी गावडे

नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करा : जिल्हाधिकारी गावडे

परभणी : जिल्ह्यात रविवारी मध्यरात्री झालेल्या जोरदार अवकाळी पावसाने जिल्ह्यातील परभणी, पूर्णा व जिंतूर तालुक्यात हाहाकार माजवला आहे. एकाच रात्रीत जिल्ह्यात ६५ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिंतूर तालुक्यातील कौसडी येथे शेळ्या, मेंढ्यासह, गाय व वासरू वाहून गेले आहे. या नुकसानग्रस्त पिकांची जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी परभणी तालुक्यातील बलसा, पिंगळी आदी गावात शेतक-यांच्या बांधावर जावून पाहणी केली. तसेच जिल्ह्यात ज्या ज्या ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे त्या सर्व ठिकाणचे नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी गावडे यांनी यावेळभ तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, कृषी सहायक यांना दिले आहेत.

परभणी जिल्ह्यात रविवारी मध्यरात्रीच्या जोरदार पावसाला सुरूवात झाली. रात्री २ वाजता पासून सुरू झालेला हा पाऊस सकाळ पर्यंत सुरूच होता. या पावसामुळे जिंतूर तालुक्यातील करपरा नदीला पूर आला होता. या अवकाळी पावसाने परभणी, जिंतूर व पूर्णा तालुक्याला झोडपून काढल्याने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहेत. जिल्ह्यात तालुकानिहाय झालेल्या पावसाचे आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. परभणी तालुका : ६८.४ मि.मि., गंगाखेड तालुका ४१.१, पाथरी तालुका ६०.९, जिंतूर तालुका ९३.४, पूर्णा तालुका ८१.२, पालम तालुका ५२.०, सेलू तालुका ६१.९, सोनपेठ तालुका ३८.७ तर मानवत तालुक्यात ५९.२ मि.मि. पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण ६५.० मि.मि. पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात झालेल्या या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी जिल्हाधिकारी गावडे यांनी सोमवार, दि.२७ नोव्हेंबर रोजी केली. त्यांनी परभणी तालुक्यातील बलसा, पिंगळी येथील शेतात प्रत्यक्ष जाऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली व जिल्ह्यामध्ये जिथे जिथे नुकसान झालेले आहे तिथे तिथे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व संबंधित तलाठी मंडळ अधिकारी, कृषी सहायक यांना दिले. यावेळी जिल्हाधिकारी गावडे यांच्या समवेत उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, तहसीलदार संदीप राजापुरे व अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR