27.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयमल्लिकार्जुन खर्गे इंडिया आघाडीचे नवे अध्यक्ष!

मल्लिकार्जुन खर्गे इंडिया आघाडीचे नवे अध्यक्ष!

नितीश कुमार नाराज; नाकारले संयोजक पद

नवी दिल्ली : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. इंडिया आघाडीच्या व्हर्चुअल बैठकीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावावर एकमत झाले. अशा स्थितीत आता इंडिया आघाडीचे नेतृत्व खर्गे यांच्याकडे राहणार असल्याचे निश्चित झाले आहे.

विरोधी पक्षांच्या बैठकीत जागावाटपापूर्वी अध्यक्षांच्या नावावर एकमत झाले आहे. यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांना समन्वयक बनवण्याची चर्चा होती. मात्र, नितीशकुमार यांनी समन्वयकपद स्वीकारण्यास नकार दिला. मला कोणत्याही पदाची इच्छा नाही असे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बराच काळ चर्चा झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्षांची इंडिया आघाडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विरोधी पक्षांच्या आघाडीत २०२४ च्या लोकसभा निवडणूकीसाठीच्या जागावाटपाचा फॉर्मुला अद्याप निश्चीत झालेला नाहीये. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे या पदासाठी उमेदवार होते. मात्र बैठकीत खुद्द नितीश कुमार यांनी मात्र काँग्रेसच्या नेत्याने हे पद सांभाळले पाहिजे असे सांगितले.

खर्गेंची जबाबदारी वाढली
इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या खर्गेंच्या खांद्यावर महत्त्वाची जबाबदारी येणार आहे. त्यामुळे खरगे आता विरोधी गटाचा चेहरा म्हणून एनडीए विरोधात उभे राहणार आहेत. अशा परिस्थितीत खर्गे यांना प्रादेशिक पक्षांसोबत जागावाटपाचे सूत्र ठरवण्याचे महत्त्वाचे आव्हान पेलावे लागणार आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते खर्गे यांची जबाबदारी आता दुहेरी होणार आहे. एकप्रकारे काँग्रेसचे अध्यक्ष असल्याने पक्षहिताबरोबरच आघाडी एकसंध ठेवण्याची जबाबदारीही त्यांना पार पाडावी लागणार आहे.

कोणत्याही पदामध्ये स्वारस्य नाही : नितीश कुमार
भारत आघाडीच्या बैठकीत संयोजक पदावरही चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नितीश कुमार यांच्या नावाचा काँग्रेसने संयोजकपदासाठी प्रस्ताव ठेवला होता. मात्र, नितीशकुमार यांनी संयोजक पद स्वीकारण्यास नकार दिला. मला कोणत्याही पदामध्ये स्वारस्य नसल्याचे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले. या आघाडी तळागाळात विस्तार करणे आवश्यक आहे. महायुतीत सामील असलेल्या पक्षांमध्ये एकजूट असणे गरजेचे असल्याचे गेखील नितीश कुमार म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR