इंफाळ : मणिपूरमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या ६४ लोकांचे मृतदेह कडेकोट बंदोबस्तात त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. अधिका-यांनी सांगितले की, मे महिन्यात जातीय हिंसाचारात बळी पडलेल्यांचे मृतदेह शवागारात ठेवण्यात आले होते. आदिवासी एकता समितीने अंत्यविधीसाठी शुक्रवारी पहाटे ५ ते सायंकाळी ५ या वेळेत सदर हिल्स कांगपोकपी येथे १२ तासांच्या पूर्ण बंदचे आवाहन केले आहे. समितीने सर्वसामान्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या हिंसाचाराच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने एक समिती स्थापन केली आहे. त्याच्या अहवालानुसार, राज्यात हिंसाचारात १७५ मृत्यू झाले आहेत. १६९ मृतदेहांची ओळख पटली. मणिपूर पोलिस आणि लष्कराच्या आसाम रायफल्सच्या तुकडीने कडेकोट बंदोबस्तात इंफाळमधील जेएनआयएमएस आणि आरआयएमएस रुग्णालयात ठेवलेल्या कुकी समुदायाच्या ६० सदस्यांचे मृतदेह विमानाने आणण्यात आले. अधिका-यांनी सांगितले की, आदिवासीबहुल जिल्ह्याच्या चुराचंदपूरच्या शवागारात ठेवलेले मेईतेई समुदायाच्या लोकांचे चार मृतदेहही इम्फाळला आणण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले.आदिवासी एकता समितीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुकी बांधवांवर शुक्रवारी फैजांग येथील शहीद स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
मणिपूर सरकारने देखरेख केलेल्या नऊ दफन स्थळांपैकी कोणत्याही ठिकाणी मृताचे नातेवाईक मृतदेह स्वीकारू शकतात आणि अंतिम संस्कार करू शकतात, असा आदेश न्यायालयाने दिला होता.किंवा महापालिका कायद्यानुसार राज्य सरकार मृतदेहांवर अंत्यसंस्कार करू शकते.
सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाने ऑगस्टमध्ये गीता मित्तल, शालिनी जोशी आणि आशा मेनन या तीन माजी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा समावेश असलेली एक समिती स्थापन केली होती. हिंसाचारग्रस्त मणिपूरमधील तपास, मदत, उपाययोजना, नुकसानभरपाई आणि पुनर्वसन यावर लक्ष ठेवण्यासाठी. त्यानंतर समितीच्या अहवालावर सर्वोच्च न्यायालयाने जातीय हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांवर ११ डिसेंबरपर्यंत अंत्यसंस्कार करण्याचे निर्देश दिले. यामध्ये ८८ लोकांचा समावेश आहे ज्यांची ओळख पटली पण ज्यांच्या मृतदेहांवर त्यांच्या कुटुंबीयांनी दावा केला नाही.