21 C
Latur
Thursday, January 2, 2025
Homeमहाराष्ट्रजरांगे यांचे सरकारला अल्टिमेटम

जरांगे यांचे सरकारला अल्टिमेटम

छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणावर मनोज जारांगे आक्रमक झाले आहेत. यापूर्वी त्यांनी मराठा आरक्षणावर निर्णय घेण्यासाठी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंतची मुदत दिली होती. तसेच त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भात राज्यभर दौरा केला आहे. दरम्यान, आता त्यांनी पुन्हा एकदा अंतरवाली सराटीत मोठी बैठक बोलाविली आहे. मराठा आरक्षणाबाबत काय निर्णय घेतला ते १७ डिसेंबरपर्यंत सांगा, असा अल्टिमेटम मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला आहे. येत्या १७ तारखेला महाराष्ट्रातील सगळ्या मराठा समाजाची अंतरवाली सराटीत बैठक बोलावली आहे. जर २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळाले नाही तर पुढील दिशा काय? त्यावर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावल्याची माहिती जरांगे पाटील यानी दिली.

१७ डिसेंबरपला आंतरवाली सराटीत सकाळी ९ वाजता बैठक होणार आहे. १२ वाजेपर्यंत सर्वांचा परिचय होईल. २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण मिळाले नाही तर पुढील दिशा काय? त्यावर १२ ते ३ दरम्यान चर्चा होईल, असे जरांगे पाटील यांनी सांगितले. अंतरवालीला जिथे सभा झाली होती तिथे बैठक होणार आहे. तसेच जरांगे यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यवर देखील टीका केली. मराठा आरक्षणाच्या विरोधात त्यांनी बोलू नये, त्यांनी खुशाल झोपावे. त्यांनी संरक्षण घावे घ्यावे, असे म्हणत जरांगे पाटील यांनी नाव न घेता भुजबळांवर निशाणा साधला. भुजबळांना फडणवीसांचा वापर करायचा आहे तर अजित पवार यांना बाजूला सारायचे असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. भुजबळांनी जरुर संरक्षण घ्याव पण त्यांनी मराठा आरक्षणावर बोलू नये असेही मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

पवार, फडणवीसांवरील रोष वाढतोय
मनोज जरंगे यांनी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. जरांगे म्हणाले की,
देवेंद्र फडणवीसांच्या लक्षात येत नाही. छगन भुजबळ हे त्यांचा वापर करुन घेत आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे भुजबळांना साथ देत आहेत. त्यामुळे मराठा समाजावर अन्याय होत आहे. या कारणामुळे फडणवीस आणि अजित पवार यांच्यावरील रोष वाढत असल्याचे जरांगे पाटील म्हणाले.

क्युरीटी पीटिशन का दाखल केली?
मराठ्यांचे आरक्षण ओबीसी आरक्षणात ५० टक्केच्या आत सापडले आहे. मग आम्हाला हेच आरक्षण द्या यावर आम्ही ठाम असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. आजच नाही पण आम्ही पहील्यापासून सांगतो, क्युरीटी पीटिशन का दाखल करत आहात? असा सवाल जरांगे पाटील यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR