22.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeछत्रपती संभाजीनगर५०० रुपयांचे बाँड घेऊन जाणा-या उमेदवारांमुळे मनोज जरांगे हैराण

५०० रुपयांचे बाँड घेऊन जाणा-या उमेदवारांमुळे मनोज जरांगे हैराण

जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकांसाठी आपली भूमिका जाहीर केली आहे. राज्यातील काही निवडक मतदारसंघात आपण उमेदवार जाहीर करत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच एसी, एसटी मतदारसंघात आपण उमेदवार देणार नाही आणि ज्या मतदारसंघात उमेदवार देणार नाही, त्या मतदारसंघातील जो उमेदवार आम्हाला ५०० रुपयांच्या बाँडवर मराठा आरक्षणासंदर्भात लिहून देईल, त्यांना पांिठबा देण्यात येईल असे जरांगे यांनी जाहीर केले होते.

त्यानंतर, अंतरवाली सराटीत ५०० रुपयांच्या बाँडवर लिहून देत उमेदवार पोहोचत आहेत. त्यावर, आता मनोज जरांगे यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे. जरांगे यांच्या घोषणेनंतर त्यांच्याकडे ५०० रुपयांच्या बाँडवर लिहून देत येणा-या उमेदवारांची संख्या वाढली आहे. ज्या मतदारसंघात मनोज जरांगे यांच्याकडून उमेदवार देण्यात येणार नाही, त्या मतदारसंघातील इतर पक्षाच्या उमेदवारांकडून बाँडवर लिहून घेतले जाणार आहे. त्यामुळे, सध्या बाँड घेऊन अंतरवाली सराटी येथे जाणा-यांची संख्या वाढल्याने मनोज जरांगे यांनी बाँड घेऊन येणा-या उमेदवारांना महत्त्वाचं आवाहन केले आहे.

तुम्ही थेट बाँड घेऊन आमच्याकडे येऊ नका, सध्या काय व्हायलयं कुणीही ५०० रुपयांचा बाँड घेऊन आमच्याकडे यायलंय. त्यामध्ये, एखाद्याकडे पैसे नसतील तर तो उसने पैसे घेऊन ५०० रुपयांचा बाँड घेऊन लिहून देतोय. मराठ्यांचे मतदान आहे, म्हणून तुम्ही उगाच बाँड लिहित बसायचे असे करु नका. अगोदर आमच्याशी संपर्क करा, किंवा येऊन भेटा. जिथं आम्ही उमेदवार देणार नाहीत, तिथं कुठल्या पक्षाचा असेल किंवा अपक्ष उमेदवार असेल त्याचे मेरीट आम्ही तपासणार आहोत. समजा एखाद्याने आम्हाला बाँडवर लिहून दिले नाही तर त्या मतदारसंघातील अपक्ष किंवा तिस-या क्रमांकाच्या उमेदवाराला आम्ही पाठिंबा जाहीर करू, असेही जरांगे यांनी स्पष्ट केले.

मराठ्यांचे मतदान फिक्स आहे, पण तू काय केलंय लोकांसाठी, तूझं मतदार किती आहे, तुझं काम काय आहे हेही पाहिलं जाणार आहे. केवळ मराठ्यांचे मतदान मिळतंय म्हणून बाँडवर लिहून देतोय, हे चालणार नाही. आमच्याकडे डायरेक्ट बाँडवर लिहून आणून देऊ नका, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, राज्यातील विविध मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवारांनी बाँडवर लिहून देण्यापूर्वी जरांगे यांची भेट घेणे अपक्षित आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR