16.5 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeमहाराष्ट्रमनोज जरांगेंच्या भूमिकेचा महायुतीला होणार फायदा

मनोज जरांगेंच्या भूमिकेचा महायुतीला होणार फायदा

पुणे : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकांसाठी ऐनवेळी भूमिका बदलली. आपण राज्यात एकही उमेदवार देणार नसल्याचे त्यांनी म्हटलं असून काही ठिकाणी पाडापाडी करायची, अशा शब्दात मराठा समाजाला आवाहन केलं आहे. त्यामुळे, मनोज जरांगे पाटील यांच्या या भूमिकेचा नेमका कोणाला फायदा होईल, यावरुन तर्क-वितर्क लढवले जात आहेत. राजकीय वर्तुळातही जरांगेंच्या भूमिकेची चर्चा होत आहे.

मनोज जरांगे यांनी सुरुवातीला सांगितले होते की, ते निवडणूक लढणार आहेत, परत त्यांनी तो निर्णय मागे घेतला आहे. आता, मनोज जरांगे यांनी सांगितलं की, चांगल्या उमेदवाराला मत द्या. मग, आम्ही स्वत:ला चांगले समजतो, त्यामुळे मनोज जरांगे यांचा आम्हाला फायदा होईल अशी मिश्कील टिपण्णी अजित पवार यांनी केली आहे.

मनोज जरांगे यांच्या निवडणूक न लढवण्याच्या निर्णयाशी आमचा संबंध नाही. मात्र, त्यांनी उमेदवार उभे केले असते तर भाजपला फायदा झाला असता, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भाने मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेल्या भूमिकेवरुन राजकीय वादळ उठलं आहे. तर, मनोज जरांगेंचा निवडणूक न लढविण्याचा निर्णय हा महाविकास आघाडीतील नेत्यांच्या सांगण्यावरुन घेतल्याची टीकाही केली जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR