जालना/बीड : मराठा आरक्षणासाठी सातत्याने लढा देणारे मनोज जरांगे हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आंतरवाली सराटी येथे मागच्या आठ दिवसांपासून त्यांचं उपोषण सुरु आहे.
उपोषणाच्या आठव्या दिवशी मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. त्यांचे ब्लड प्रेशर डाऊन झाले आहे. उपोषणस्थळी गर्दी जमली असून उपोषण स्थगित करण्याची विनंती लोक करीत आहेत. परंतु मनोज जरांगे काहीही ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नाहीत.
मराठा आंदोलक संतप्त झालेले असून वडीगोद्री येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. दुसरीकडे बीडमध्ये तर एसटी प्रशासनाने बस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलक संतप्त असून सरकारने तोडगा काढण्याची मागणी होत आहे.