24.8 C
Latur
Tuesday, March 4, 2025
Homeमहाराष्ट्ररेल्वेच्या चाकाचे छत्रपती संभाजीनगरात उत्पादन

रेल्वेच्या चाकाचे छत्रपती संभाजीनगरात उत्पादन

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
ज्युपिटर वॅगन्स लिमिटेडच्या प्रत्यक्ष कामाला मार्च महिन्यात सुरुवात झाली आहे. त्याबाबत बुधवारी अधिकृत घोषणा करण्यात आली. सध्या १ हजार व्हील तयार होत आहेत. लवकरच ५ हजार इतकी क्षमता करण्यात येईल. भारत सरकारला तसेच बाहेरील देशांमध्ये चाकांची निर्यात करण्यात येईल. जवळपास ६०० जणांना रोजगार निर्माण होणार असून कोट्यवधींची गुंतवणूक या निमित्ताने करण्यात येणार असल्याची माहिती संचालक लोहिया यांनी दिली.

बोनाट्रान्सचे अधिग्रहण केल्यानंतर जेडब्ल्यूएल रेल्वे रोलिंग स्टॉक उत्पादन क्षेत्रात आघाडी असलेला कारखाना मानला जातो. ज्युपिटर तात्रावॅगोंका रेलव्हील फॅक्टरी हा स्थानिक वापरासाठी आणि निर्यातीसाठी दोन्ही प्रकारच्या व्हीलसेट्सचे उत्पादन करणारा भारतातील पहिला कारखाना आहे. भारताचे आयात व्हीलसेट्सवर असलेले अवलंबित्व कमी करण्यासाठी, तसेच भारतीय रेल्वे उद्योगक्षेत्र आणि जागतिक बाजारपेठेतील वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.

ज्युपिटर वॅगन्सने शुलर इंडियासोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा करण्यात आली आहे. या भागीदारीच्या माध्यमातून अत्याधुनिक फोर्जिंग मशिनरी पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे कारखान्याची क्षमता वाढेल. रेल्वे उद्योगक्षेत्रासाठी महत्त्वाचे निर्मिती केंद्र म्हणून त्यांची भूमिका अधिक भक्कम होईल. या सहयोगातून स्थानिक मागणी आणि वाढत्या निर्यात संधी या दोन्ही गरजा पूर्ण करण्यासाठी जेएसडब्ल्यूएलचे उत्पादन वाढविण्याचे उद्दिष्ट आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR