22.8 C
Latur
Saturday, December 21, 2024
Homeमहाराष्ट्रगडचिरोलीत माओवादी कमांडर रूपेश मडावी ठार

गडचिरोलीत माओवादी कमांडर रूपेश मडावी ठार

मडावीवर ७५ लाखांहून अधिकचे होते बक्षीस

गडचिरोली : छत्तीसगड राज्यात सोमवार (ता. २३) पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत गडचिरोली जिल्ह्यातसुद्धा सक्रिय असलेला माओवाद्यांच्या दंडकारण्य विशेष विभागीय समिती सदस्य आणि कंपनी १० चा कमांडर रूपेश मडावी चकमकीत ठार झाला आहे.

सोमवारी महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेवर छत्तीसगड पोलिस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली होती. यामध्ये एका महिलेसह तीन माओवादी ठार झाले. यात रूपेशचा समावेश आहे. त्याच्यावर तीन राज्यांत ७५ लाखांहून अधिक बक्षीस होते. गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीतील प्रमुख माओवादी नेता म्हणून त्याची ओळख होती. प्राप्त माहितीनुसार, सोमवारी गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेपासून जवळ असलेल्या सुकमा जिल्ह्यातील चिंतलनार पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणा-या करकनगुडा, अबुझमाड जंगल परिसरात मोठ्या संख्येने माओवादी असल्याची माहिती छत्तीसगड पोलिसांना मिळाली.

यावरून डीआरजी, बस्तर फायटर आणि कोब्रा बटालियनच्या जवानांनी या परिसरात संयुक्त माओवादविरोधी अभियान राबविले. दरम्यान, पोलिस आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. ही चकमक जवळपास चार तास सुरू होती. घनदाट जंगलाचा फायदा घेत माओवादी पळून गेले. चकमक स्थळी पोलिसांनी शोध घेतला असता रात्री उशिरा तीन माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले. मंगळवार (ता. २४) सकाळी मृत माओवाद्यांची ओळख पटवण्यात आली. यामध्ये रूपेश मडावी (वय ४७) आणि माओवाद्याचा माड एरिया तांत्रिक विभागीय समितीचा सदस्य असलेला जगदीश याचा समावेश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR