25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रलोकसभेसाठी मराठा समाजाकडून उमेदवार देणार

लोकसभेसाठी मराठा समाजाकडून उमेदवार देणार

गावोगावी मराठा समाजाच्या बैठका 

पुणे : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलन सुरु करण्यात आहे. राज्य सरकारने मराठा समाजास दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु हा निर्णय मराठा समाजास मान्य नाही.

यामुळे मराठा समाजाने गावागावत बैठका घेणे सुरु केले आहे. या बैठकांच्या माध्यमातून लोकसभेसाठी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला जात आहे. अनेक ठिकाणी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. यामुळे लोकसभा निवडणुका ईव्हीएमवर घेता येणार नाही.

मावळ लोकसभेसाठी उमेदवार देणार
मावळ लोकसभा मतदारसंघात मराठा समाज उमेदवार देणार आहे. मराठा समाजाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मावळ लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात येणार आहे. आता दुसरीकडे मावळ लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाकडून देखील उमेदवार देण्यात येणार आहे. त्यासाठी मावळ तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने गावोगावी बैठका घेण्यास सुरुवात केलेली आहे.

चौघांनी जीवन संपवले
आधी आरक्षण नंतर इलेक्शन म्हणत आरक्षणासाठी मराठवाड्यात चार जणांनी जीवन संपवले. आष्टी, बीड, बदनापूर, रेनापूर येथे आत्महत्याच्या घटना घडल्या. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी स्टेटस ठेवून तसेच पत्र लिहून यांनी जीवन संपवले. उद्धव कोल्हे, नंदकुमार जाधव,चंद्रकांत पतंगे, दिलीप सोनवणे असे चार जणांची नावे आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR