वसमत : मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला असून आरक्षणासाठी मनोज जरांगे उपोषणास बसलेले आहेत. दरम्यान त्यांची तब्येत खालावली असून या पार्श्वभूमीवर येथील आंदोलकांनी परभणी रोड येथील मौजे खांडेगाव पाटी येथे वसमत आगारातील वसमत-पुणे जाणारी एसटी बस जाळली.
मराठा आरक्षणासाठी अंतरवेली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांच्या समर्थनात संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलने होत आहेत. गेल्या सहा ते सात दिवसांपासून आरक्षण मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांची तब्येत खालवल्याने आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. त्याच पार्श्वभूमीवर वसमत तालुक्यात व शहरात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर मराठा समाज बांधव उपोषणास बसले आहे
तसेच परभणी रोड येथील बहिर्जी स्मारक विद्यालयाच्या गेटासमोर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले वसमत तालुक्यासह शहरात विविध ठिकाणी रास्ता रोको करण्यात आले. परभणी रोड येथील सती पांगरापाटी थोरावा पाटीवर खांडेगाव पाटी तसेच परभणी रोड येथील बहिर्जी कॉर्नर या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आले. रास्ता रोको करून निवेदन देण्यात आले. यावेळी सकल मराठा समाज बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.